अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचा परिणाम क्रिकेटमध्येही दिसून येत आहे. मध्य पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थिमुळे आयससी क्रिकेट परिषदेची दोहा येथील महत्त्वपूर्ण बैठक रद्द करण्याची वेळ आली आहे. या बैठकीत क्रिकेटसंदर्भातील काही महत्त्वपूर्ण निर्णय अपेक्षित होते. २५ ते २७ मार्च दरम्यान कतारच्या राजधानीत पहिल्यांदाच आयसीसीची ही बैठक पार पडणार होती.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या महत्त्वपूर्ण मुद्यावर होणार होती चर्चा
इएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, प्रस्तावित बैठकीत आयसीसी ग्लोबल ब्रॉडकास्टिंग अधिकार आणि पुढच्या कार्यक्रमाची रुपरेषा पक्की करण्यासंदर्भातील महत्त्वपूर्ण चर्चा होणार होती. याशिवाय २०२८ मध्ये लॉस एंजिलिस येथे नियोजित ऑलिम्पिक स्पर्धेतील क्रिकेट संघाच्या पात्रतेसंदर्भातील निकष निर्धारित करण्यासंदर्भातही ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात होती. पण आता ही बैठक लांबणीवर पडली आहे. ICC अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, परिस्थिती लवकर सामान्य झाली आणि एअरस्पेस पुन्हा पूर्णपणे सुरू झाले तर एप्रिलमध्ये बोर्ड आणि विविध समित्यांच्या सदस्यांची एकत्रित बैठक घेण्याचा विचार केला जाऊ शकतो. या बैठकीत ICC बोर्ड डायरेक्टर्स, विविध क्रिकेट बोर्डांचे CEO, समिती सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार होते.
आयसीसीच्या बैठकीसह श्रीलंका अफगाणिस्तान यांच्यातील मालिकेवरही परिणाम
गेल्या काही वर्षांत कतारमध्ये क्रिकेटची लोकप्रियता वाढत आहे. याच पाश्वभूमीवर पहिल्यांदाच ICC नं कतार येथील दोहामध्ये बैठक घेण्याचा निर्णय घेतला होता. ICC च्या बैठकीशिवाय श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिकेलाही मध्य पूर्वेतील तणावाचा फटका बसला आहे. युएईमध्ये १३ ते २५ मार्च दरम्यान आयोजित द्विपक्षिय मालिका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान ICC ची 'कसरत'
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात पेटलेल्या वादामुळे विमान सेवेवर मोठा परिणाम झाला आहे. अनेक उड्डाणे रद्द केल्यामुळे ICC स्पर्धेसाठी भारतात आलेल्या परदेशी खेळाडूंना मायदेशी पाठवण्यासाठी ICC ला मोठी कसरत करावी लागत आहे. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजसारखे संघ स्पर्धा संपल्यावरही भारतात अडकून असल्याचेही समोर आले होते. मायदेशी परतण्यास विलंब असल्यामुळे खेळाडूंनी नाराजीही व्यक्त केली होती.
Web Summary : Geopolitical tensions forced ICC to postpone Doha meeting, impacting future plans. Series between Sri Lanka and Afghanistan delayed. Travel disruptions from the conflict caused logistical challenges for T20 World Cup teams leaving India.
Web Summary : भू-राजनीतिक तनाव के कारण आईसीसी को दोहा बैठक स्थगित करनी पड़ी, जिससे भविष्य की योजनाएं प्रभावित हुईं। श्रीलंका और अफगानिस्तान के बीच श्रृंखला स्थगित। संघर्ष से यात्रा में व्यवधान के कारण टी20 विश्व कप टीमों को भारत छोड़ने में दिक्कतें आईं।