ICC Announces Under 19 Men’s ODI World Cup Schedule : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेन (ICC) नामिबिया आणि झिम्बाब्वेमध्ये होणाऱ्या १९ वर्षांखालील पुरुष विश्वचषक स्पर्धा २०२६ स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ५ जानेवारी जानेवारी ते ६ फेब्रुवारी या कालावधीत रंगणाऱ्या अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धेत १६ संघाचा समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
भारत-पाक वेगवेगळ्या गटात
या स्पर्धेतील साखळी फेरीतील लढती या चार गटात खेळवण्यात येणार असून प्रत्येक गटात ४-४ संघ अशी विभागणी करण्यात आली आहे भारत-पाक हे दोन्ही संघांना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले आहे. त्यामुळे साखळी फेरीत भारत-पाकिस्तान यांच्यात सामना रंगल्याचे पाहायला मिळणार नाही. पण बादफेरीतील लढतींमध्ये मात्र हे संघ समोरासमोर आल्याचे पाहायला मिळू शकते. भारतीय संघाने सर्वाधिक पाच वेळा ही स्पर्धा जिंकली असून आगामी हंगामात अमेरिकेविरुद्धच्या लढतीनं भारतीय संघ या मोहिमेला सुरुवात करेल.
कोणता संघ कोणत्या गटातून खेळणार?
- 'अ' गटातील संघ - भारत, बांगलादेश, अमेरिका आणि न्यूझीलंड
- 'ब' गटातील संघ - झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड आणि स्कॉटलंड
- 'क' गटातील संघ - ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान आणि श्रीलंका
- 'ड' गटातील संघ - टांझानिया, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका
U19 World Cup 2026 स्पर्धेचे संपूर्ण वेळापत्रक
१५ जानेवारी, २०२६
- अमेरिका विरुद्ध भारत – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- झिम्बाब्वे विरुद्ध स्कॉटलंड – ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे
- टांझानिया विरुद्ध वेस्ट इंडिज – HP ओव्हल, विंडहोक
१६ जानेवारी, २०२६
- पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड – ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयर्लंड – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
- अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका – HP ओव्हल, विंडहोक
१७ जानेवारी, २०२६
- भारत विरुद्ध बांगलादेश – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- जपान विरुद्ध श्रीलंका – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
१६ जानेवारी, २०२६
- न्यूझीलंड विरुद्ध USA – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- इंग्लंड विरुद्ध झिम्बाब्वे – ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे
- वेस्ट इंडिज विरुद्ध अफगाणिस्तान – HP ओव्हल, विंडहोक
१९ जानेवारी, २०२६
- पाकिस्तान विरुद्ध स्कॉटलंड – ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे
- श्रीलंका विरुद्ध आयर्लंड – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
- दक्षिण आफ्रिका विरुद्ध टांझानिया – HP ओव्हल, विंडहोक
२० जानेवारी, २०२६
- बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- ऑस्ट्रेलिया विरुद्ध जपान – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
२१ जानेवारी, २०२६
- इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड – ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे
- अफगाणिस्तान विरुद्ध टांझानिया – HP ओव्हल, विंडहोक
२२ जानेवारी, २०२६
- झिम्बाब्वे विरुद्ध पाकिस्तान – ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे
- आयर्लंड विरुद्ध जपान – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
- वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका – HP ओव्हल, विंडहोक
२३ जानेवारी,२०२६
- बांगलादेश विरुद्ध USA – ताकाशिंगा स्पोर्ट्स क्लब, हरारे
- श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
२४ जानेवारी, २०२६
भारत विरुद्ध न्यूझीलंड – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
सुपर सिक्स फेरी
२५ जानेवारी, २०२६
- A4 विरुद्ध D4 – HP ओव्हल, विंडहोक
- A1 विरुद्ध D3 – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
- D2 विरुद्ध A3 – HP ओव्हल, विंडहोक
२६ जानेवारी, २०२६
- B4 विरुद्ध C4 – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
- C1 विरुद्ध B2 – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
- D1 विरुद्ध A2 – नामिबिया क्रिकेट ग्राउंड, विंडहोक
२७ जानेवारी, २०२६
- C2 विरुद्ध B3 – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
- C3 विरुद्ध B1 – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
२८ जानेवारी, २०२६
- A1 विरुद्ध D2 – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
२९ जानेवारी, २०२६
- D3 विरुद्ध A2 – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
३० जानेवारी, २०२६
- D1 विरुद्ध A3 – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
- B3 विरुद्ध C1 – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
३१ जानेवारी, २०२६
- B2 विरुद्ध C3 – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
१ फेब्रुवारी, २०२६
- B1 विरुद्ध C2 – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
नॉकआउट फेरी
३ फेब्रुवारी, २०२६
- पहिला उपांत्य सामना – क्वीन्स स्पोर्ट्स क्लब, बुलावायो
४ फेब्रुवारी, २०२६
- दुसरा उपांत्य सामना – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
६ फेब्रुवारी, २०२६
- अंतिम सामना – हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे