Join us  

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ICCचा दोन महत्त्वाच्या स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय

कोरोना व्हायरसचा दोन क्रिकेट स्पर्धांना फटका...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 1:24 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 42 लाख 56,538 वर गेली असून त्यापैकी 15 लाख 27,726 रुग्ण बरे झाले आहेत. पण, मृतांचा आकडा 2 लाख 87,353 वर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) मंगळवारी दोन मोठ्या स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला.  महिला क्रिकेट वर्ल्ड कप पात्रता आणि 19 वर्षांखालील वर्ल्ड कप पात्रता युरोप डिव्हिजन 2 स्पर्धा आयसीसीनं स्थगित केल्या आहेत. 

... म्हणून हा सर्व आटापिटा; IPL 2020 रद्द होणं BCCIला परवडणारं नाही!

संलग्न सदस्य, सरकार आणि आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर 2021मध्ये होणाऱ्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची पात्रता फेरी आणि 2022मध्ये होणारी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेसाठीची पात्रता फेरी स्थगित करण्याचा निर्णय घेतला, असे आयसीसीनं सांगितले. महिला क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता फेरी 3 ते 19 जुलै या कालावधीत श्रीलंकेत होणार होती. त्यातून 2021साठी न्यूझीलंड येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी तीन संघ पात्र ठरणार होते. 2022मध्ये होणाऱ्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेची पात्रता फेरी युरोपियन विभागातून डेन्मार्क येथे 24 ते 30 जुलै या कालावधीत होणार होती.   

Corona Virus : 85 वर्षीय आजीच्या निःस्वार्थ सेवेला मोहम्मद कैफचा सलाम; तुम्हालाही वाटेल अभिमान 

आयसीसी स्पर्धा प्रमुख ख्रिस टेटली म्हणाले,''कोरोना व्हायरसमुळे प्रवासावर घातलेले निर्बंध, आरोग्य विभाग आणि सरकार यांचा सल्ला घेऊन या स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी, प्रेक्षक यांची सुरक्षितता हे आमचे प्राधान्य आहे.''    

Video : MS Dhoniच्या नव्या लूकवर युजवेंद्र चहल म्हणतो, थाला वन मोर टाईम!

वीरू, गंभीरला शिवीगाळ करू शकतो, पण...; Shoaib Akhtar पुन्हा बरळला

महेंद्रसिंग धोनीनं रागात बॅट फेकली अन् ड्रेसिंग रुममध्येही आदळआपट केली; इरफान पठाणनं सांगितला किस्सा 

2008 मध्ये धोनीने कप्तानपद सोडण्याची दिली होती धमकी?, आरपी सिंगने सांगितले यामागील सत्य!

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याआयसीसी