2008 मध्ये धोनीने कप्तानपद सोडण्याची दिली होती धमकी?, आरपी सिंगने सांगितले यामागील सत्य!

महेंद्रसिंग धोनीच्या बाबतीत टीम इंडियाचे माजी गोलंदाज आरपी सिंग याने मोठे वक्तव्य केले आहे. महेंद्रसिंग धोनी आपल्या कप्तानीमध्ये कधीही टीमची निवड करताना भेदभाव करत नव्हता, असे आरपी सिंगचे म्हटले आहे.

आपला मित्र कोणता खेळाडू आहे, हे पाहून त्याला टीममध्ये घेणारा कप्तान महेंद्रसिंग धोनी नव्हता, असेही मत आरपी सिंगचे आहे.

महेंद्रसिंग धोनी आज ज्या शिखरावर पोहोचला आहे. त्या पाठीमागे कारण आहे की, त्याने टीम निवड करताना भेदभाव केला नाही, असे आरपी सिंह म्हणाला.

आरपी सिंगने 2008 मध्ये निवड समितीची बैठकीत लीक झालेल्या माहितीबद्दल सांगितले. तेव्हाच्या रिपोर्टनुसार, महेंद्रसिंग धोनीने आरपी सिंगच्या जागी इरफान पठाणला टीममध्ये सामील करण्यास सांगितल्यावर महेंद्रसिंग धोनीने निवडकर्त्यांना कप्तान पद सोडण्याची धमकी दिली होती.

2008 मध्ये एका मीडिया रिपोर्टनुसार असे समोर आले होते की, आरपी सिंगच्या जागी इरफान पठाणच्या निवडीला महेंद्रसिंग धोनी असहमत होते. त्यावेळी निवड कर्त्यांनी आरपी सिंगच्या जागी इरफान पठाणची निवड करण्यास सांगितले, तर महेंद्रसिंग धोनीने कप्तान पद सोडणार असल्याचे म्हटले होते.

याबाबत आरपी सिंगने सांगितले की, ज्यावेळी चांगल्या खेळाडूची निवड करण्याची चर्चा झाली. त्यावेळी महेंद्रसिंग धोनीने आपल्या टीमसाठी निष्पक्ष होऊन निर्णय घेतला होता आणि ज्यावेळी चर्चा लीक झाली, त्यावेळी त्याचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही.

2008 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या 5 सामन्यांची एकदिवसीय मालिका आठवताना आरपी सिंग म्हणाला, "इंदूरमध्ये खेळलेल्या एक दिवसीय सामन्यात मला विकेट मिळाला नव्हता. खेळाडूला दोन किंवा तीन संधी मिळणे महत्वाचे आहे, परंतु नेहमीच असे होत नाही."

आरपी सिंग म्हणाला, "गोलंदाजी वेगवान आणि स्विंग करणे थांबले होते, त्यामुळे मी जास्त खेळू शकलो नाही. जर मी त्यावेळी गोलंदाजी सुधारू शकलो असतो, तर मी आणखी काही सामने खेळलो असतो."

माझ्यात कुठे सुधारणा करण्याची गरज आहे, याविषयी मी आणि महेंद्रसिंग धोनी चर्चा करायचो. मी कशाप्रकारे खेळू शकतो, हे महेंद्रसिंग धोनीला माहीत आहे. आमची मैत्री वेगळी गोष्ट आहे, पण देशासाठी खेळणे ही वेगळी गोष्ट आहे, असेही आरपी सिंगने सांगितले.

आरपी सिंग म्हणाला, "महेंद्रसिंग धोनी एक असा कप्तान होता, ज्याने ज्या खेळाडूंना पुढे जाण्यास मदत केली. जे भविष्यात देशासाठी अधिक चांगले काम करू शकतील."