ICC Announced ODI Team Of The Year : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं वातावरण तापलं असताना या बहुप्रतिक्षित वनडे स्पर्धेआधी आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) 'वनडे टीम ऑफ द ईयर'ची घोषणा केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आयसीसीनं २०२४ या वर्षातील सर्वोत्तम कामगिरीच्या जोरावर निवडलेल्या संघात पाकिस्तान, श्रीलंका, अफगानिस्तान आणि वेस्टइंडीज या खेळाडूंचा समावेश आहे. पण यात एकही भारतीय खेळाडू दिसत नाही.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयसीसीच्या संघात का नाही मिळालं एकाही भारतीय खेळाडूला स्थान?
आयसीसीच्या सर्वोत्तम प्लेइंग इलेव्हनमध्ये एकही भारतीय खेळाडू नसणं ही आश्चर्यकारक बाबच आहे. अनेक क्रिकेट चाहत्यांना असं कशी निवडली टीम? असा प्रश्नही पडू शकतो. पण यामागही एक कारण आहे. २०२४ या वर्षात भारतीय संघाने फक्त ३ एकदिवसीय सामने खेळले आहेत. एवढेच नाही तर यातला एकही सामना भारतीय संघाने जिंकलेला नाही. त्यामुळेच आयसीसीच्या वनडे संघात एकाही भारतीय खेळाडूला स्थान मिळालेले नाही.
आयसीसीच्या संघात अफगाणिस्तान अन् श्रीलंकेच्या खेळाडूंचा भरणा
आयसीसीने वर्षातील सर्वोत्तम एकदिवसीय संघ निवडताना अफगाणिस्तानसह आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पात्र नसलेल्या संघातील श्रीलंकेच्या खेळाडूंचा भरणा दिसून येते. या दोन्ही संघाने २०२४ मध्ये सर्वाधिक वनडे सामने खेळले आहेत. त्यामुळे या वनडे संघाची कॅप्टन्सीही श्रीलंकेच्या असलंकाला दिल्याचे पाहायला मिळते.
आयसीसीच्या संघात कोणत्या देशाचे किती खेळाडू?
आयसीसीच्या 'वनडे टीम ऑफ द ईयर' संघात श्रीलंकेच्या सर्वाधिक ४ खेळाडूंचा समावेश असन पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या संघातील प्रत्येकी तिघांची वर्णी लागली आहे. तर वेस्ट इंडिजच्या ताफ्यातील एका खेळाडूचा नंबर लागला आहे. श्रीलंकेचा कुसल मेंडिसला विकेट किपरच्या रुपात संधी देण्यात आली असून जलदगती गोलंदाजांमध्ये पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदीसह हॅरिस रौफचा समावेश असल्याचे दिसून येते. आयसीसीच्या वनडे प्लेइंग इलेव्हनमध्ये १० आशियाई खेळाडूंनी बहरली आहे.
ICC वनडे टीम ऑफ द ईयर २०२४
सॅम अयूब, रहमानुल्लाह गुरबाज, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, शेरफेन रदरफोर्ड, अजमतुल्लाह उमरझई, वानिंदु हसरंगा, शाहिन शाह आफ्रिदी, हॅरिस राउफ, अल्लाह गजनफर.
Web Title: ICC Announced ODI Team Of The Year No Indian Cricket Team Player Name In This Playing Eleven
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.