Join us  

आपापली बॅटरी रिचार्ज करा; Sachin Tendulkarचा टीम इंडियाच्या खेळाडूंना सल्ला

लॉकडाऊनमध्ये सचिन तेंडुलकर काय काय करतो...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 5:57 PM

Open in App

कोरोना व्हायरसच्या संकटात सर्व क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. इंडियन प्रीमिअर लीगवरही अनिश्चितेचं सावट आहे. अशात खेळाडूंना आपापल्या कुटुंबीयांना बराच वेळ द्यायला मिळत आहे. पण, घरात रहावे लागत असताना खेळाडूंना त्यांच्या तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरतेची काळजी घ्यावी लागत आहे. क्रिकेटपासून इतके दिवस दूर रहावे लागत असल्याचा फटका खेळाडूंच्या तंदुरुस्तीला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय खेळाडूंना मोलाचा सल्ला दिला आहे. कोरोना व्हायरसनंतर क्रिकेट सुरू झाल्यावर सध्याच्या क्रिकेटपटूंनी स्वतःला शारीरिक आणि मानसिक कसे तयार ठेवायला हवं, या प्रश्नावर तेंडुलकर म्हणाला,''मी एवढचं सांगेन की आपापली बॅटरी रिचार्ज करा. सातत्यानं क्रिकेट खेळताना रोज सर्वोत्तम कामगिरी करणे, सोपं नाही. थोडी विश्रांती आवश्यक आहे. आता तो आराम मिळत आहे, त्यामुळे आपापली बॅटरी चार्ज ठेवा. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक कणखरता यावर मेहनत घ्या. भूतकाळात काय चुकले, काय बरोबर केले त्याचा विचार करा. चुका कशा सुधारता येतील यावर अभ्यास करा.''

यावेळी सचिननं त्याचा लॉकडाऊनच्या काळातील दिनक्रम सांगितला.

पाहा व्हिडीओ...

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी

 विश्वनाथन आनंद अन् युजवेंद्र चहल यांनी उभारला लाखोंचा निधी; कचरा वेचणाऱ्यांना करणार मदत

लॉकडाऊनमध्ये हार्दिक-नताशाचं चाललंय काय? पाहा व्हिडीओ...

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले पाकिस्तानी क्रिकेटपटू!

न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकानं मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Video : युवराज सिंगची इच्छा पूर्ण, जसप्रीत बुमराहनं शेअर केला 'तो' दुर्मिळ व्हिडीओ

Chris Gayleची माजी सहकाऱ्यावर गंभीर टीका; कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असल्याचा आरोप

टॅग्स :सचिन तेंडुलकरबीसीसीआयकोरोना वायरस बातम्या