Video : युवराज सिंगची इच्छा पूर्ण, जसप्रीत बुमराहनं शेअर केला 'तो' दुर्मीळ व्हिडीओ

युवराज सिंगनं काही दिवसांपूर्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहची फिरकी घेतली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 04:17 PM2020-04-28T16:17:17+5:302020-04-28T16:19:52+5:30

whatsapp join usJoin us
Video : On popular demand by Yuvraj Singh, Jasprit Bumrah shares video of his 20-ball 42 svg | Video : युवराज सिंगची इच्छा पूर्ण, जसप्रीत बुमराहनं शेअर केला 'तो' दुर्मीळ व्हिडीओ

Video : युवराज सिंगची इच्छा पूर्ण, जसप्रीत बुमराहनं शेअर केला 'तो' दुर्मीळ व्हिडीओ

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगनं काही दिवसांपूर्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहची फिरकी घेतली होती. कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द झाल्यामुळे खेळाडू इंस्टाग्राम लाईव्हवरून एकमेकांशी संवाद साधत आहेत. युवी आणि बुमराह यांच्यात अशीच एक चर्चा झाली. युवीनं यावेळी बुमराहनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या धावांवरून फिरकी घेतली.  

युवी म्हणाला की,''वन डे क्रिकेटमध्ये तुझी सर्वोत्तम धावसंख्या 10 आहे, कसोटीत 10 आणि आयपीएलमध्ये 16 आहे. तू आतापर्यंत 80 प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 82 धावा केल्या आहेत.'' त्यावर बुमराहनं युवीला त्याच्या एका खेळीची आठवण करून दिली. बुमराहनं 20 चेंडूंत 42 धावा चोपल्या होत्या. बुमराह म्हणाला,''मी गोवा संघाविरुद्ध 20 चेंडूंत 42 धावा चोपल्या आहेत. ही माझी सर्वोत्तम खेळी आहे.''

युवीच्या फिरकीला बुमराहनं 2017च्या त्या खेळीचा व्हिडीओ पोस्ट करून उत्तर दिले. त्यावर त्यानं लिहीलं की,''युवीच्या आग्रहास्तव, जसप्रीत बुमराहची मॅच विनिंग खेळी.'' 2017च्या गुजरात विरुद्ध गोवा या सामन्यात गुजरातनं 9 बाद 277 धावा केल्या होत्या. 278 धावांचा पाठलाग करताना गोवा संघ 199 धावांत तंबूत परतला होता. या सामन्यात बुमराहनं 42 धावांची वादळी खेळी केली होती.  

पाहा व्हिडीओ...

 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी

 विश्वनाथन आनंद अन् युजवेंद्र चहल यांनी उभारला लाखोंचा निधी; कचरा वेचणाऱ्यांना करणार मदत

लॉकडाऊनमध्ये हार्दिक-नताशाचं चाललंय काय? पाहा व्हिडीओ...

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले पाकिस्तानी क्रिकेटपटू!

न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकानं मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Web Title: Video : On popular demand by Yuvraj Singh, Jasprit Bumrah shares video of his 20-ball 42 svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.