Chris Gayleची माजी सहकाऱ्यावर गंभीर टीका; कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असल्याचा आरोप

वेस्ट इंडिज संघाचा स्टार फलंदाज आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनं यू ट्युब चॅनेलवरून माजी सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 05:22 PM2020-04-28T17:22:06+5:302020-04-28T17:22:36+5:30

whatsapp join usJoin us
Video : 'You are worse than Coronavirus', Chris Gayle slams ex-Windies teammate svg | Chris Gayleची माजी सहकाऱ्यावर गंभीर टीका; कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असल्याचा आरोप

Chris Gayleची माजी सहकाऱ्यावर गंभीर टीका; कोरोना व्हायरसपेक्षाही भयंकर असल्याचा आरोप

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वेस्ट इंडिज संघाचा स्टार फलंदाज आणि युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलनं यू ट्युब चॅनेलवरून माजी सहकाऱ्यावर गंभीर आरोप केले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील जमैका थलाव्हास संघानं गेलला रिलीज केले. गेल कॅरेबियन प्रीमिअर लीग 2020च्या मोसमात आता सेंट ल्युसिया झौक्स संघाकडून खेळणार आहे. थलाव्हास संघाच्या निर्णयावर 40 वर्षीय गेलनं नाराजी व्यक्त केली आणि ती करताना त्यानं राष्ट्रीय संघातील माजी सहकारी रामनरेश सारवानवर गंभीर आरोप केले. थलाव्हास संघाकडून गेलनं दोन वेळा कॅरेबियन प्रीमिअर लीगचे जेतेपद पटकावले आहे.

गेलनं यू ट्युबर तीन भागाचा व्हिडीओ पोस्ट केला. त्यात त्यानं थलाव्हास संघानं करार रद्द करण्यासाठी पडद्यामागे अनेक गोष्टी घडल्या, असा दावा केला आहे. थलाव्हास संघानं रिलीज करण्यामागे सारवानचा हात असल्याचा आरोप गेलनं केलं. हे आरोप करताना गेलनं सारवानला 'साप' म्हटले आणि तो कोरोना व्हायरसपेक्षा भयंकर असल्याचाही आरोप केला.

गेल म्हणाला,''माझ्या वाढदिवसाला सारवाननं संघाच्या वाटचालीबाबात मोठं भाषण केलं होतं. मग, असं काय घडलं की मला रिलीज केलं गेलं? सारवान तू साप आहेस. कॅरेबिन बेटावर तू कोणालाच आवडत नाहीस. तू अजूनही बालीश आहेस.'' 
''लोकांसमोर तू चांगला माणूस, संत असल्याचा आव आणतोस, पण तू राक्षस आहेस,'' असेही गेल म्हणाला.  

पाहा व्हिडीओ... 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी

 विश्वनाथन आनंद अन् युजवेंद्र चहल यांनी उभारला लाखोंचा निधी; कचरा वेचणाऱ्यांना करणार मदत

लॉकडाऊनमध्ये हार्दिक-नताशाचं चाललंय काय? पाहा व्हिडीओ...

भ्रष्टाचाराच्या आरोपात अडकले पाकिस्तानी क्रिकेटपटू!

न्यूझीलंडच्या माजी प्रशिक्षकानं मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Video : युवराज सिंगची इच्छा पूर्ण, जसप्रीत बुमराहनं शेअर केला 'तो' दुर्मिळ व्हिडीओ

Web Title: Video : 'You are worse than Coronavirus', Chris Gayle slams ex-Windies teammate svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.