Corona Virus : विश्वनाथन आनंद अन् युजवेंद्र चहल यांनी उभारला लाखोंचा निधी; कचरा वेचणाऱ्यांना करणार मदत

चहलनं 12 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे जेतेपद पटाकवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2020 11:42 AM2020-04-28T11:42:37+5:302020-04-28T11:43:26+5:30

whatsapp join usJoin us
Viswanathan Anand, Yuzvendra Chahal Raises Rs 8.8 Lakh For COVID-19 Relief Funds svg | Corona Virus : विश्वनाथन आनंद अन् युजवेंद्र चहल यांनी उभारला लाखोंचा निधी; कचरा वेचणाऱ्यांना करणार मदत

Corona Virus : विश्वनाथन आनंद अन् युजवेंद्र चहल यांनी उभारला लाखोंचा निधी; कचरा वेचणाऱ्यांना करणार मदत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी माजी विश्वविजेता विश्वनाथन आनंद आणि भारताचा क्रिकेटपटू युजवेंद्र चहल यांनी पुढाकार घेतला आहे. आनंद आणि चहल यांनी कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी निधी गोळा करण्याच्या दृष्टीनं ऑनलाईन चेस चॅरिटी इव्हेंट भरवला होता. या इव्हेंटमध्ये विदीत गुजराती, ग्रँडमास्टार निहाल सरीन, महिला ग्रँडमास्टर तानिया सचदेव आमि क्रोएशियाचा अँटोनिया रॅडीक यांनी सहभाग घेतला होता. या सर्वांनी मिळून 8.8 लाखांचा निधी गोळा केला आहे. हा निधी कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वापरण्यात येणार आहे.

चहल हा माजी बुद्धीबळपटू आहे. त्यानं 12 वर्षांखालील राष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धेचे जेतेपद पटाकवले आहे. 5 एप्रिलला ही ऑनलाईन ब्लित्झ स्पर्धेत सहभाग घेतला होता. आनंदने 11 एप्रिलला ही स्पर्धेत सहभाग घेतला. तोपर्यंत या स्पर्धेतून 4.5 लाखांचा निधी गोळा झाला होता. आनंद, पी हरिकृष्णा आणि बी आदीबान, कोनेरू हम्पी आणि द्रोणावली हरिका यांनीही सहभाग घेतला. 

''या स्पर्धेतून 8.86 लाखांचा निधी गोळा केला असल्याची माहिती,'' इंटरनॅशनल मास्टर आणि चेस.कॉम. इंडियाचे डायरेक्र राकेश कुलकर्णी यांनी पीटीआयला सांगितले.


IPL 2020 विसरा, ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही पुढे ढकलण्यात येणार; Shoaib Akhtarची भविष्यवाणी

Web Title: Viswanathan Anand, Yuzvendra Chahal Raises Rs 8.8 Lakh For COVID-19 Relief Funds svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.