IND vs AUS: "मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली" 

nathan lyon and r ashwin: सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 15:12 IST2023-02-15T15:11:52+5:302023-02-15T15:12:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
I watched so much footage of Ashwin on my laptop that my wife went crazy, said Australian spinner Nathan Lyon   | IND vs AUS: "मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली" 

IND vs AUS: "मी माझ्या लॅपटॉपवर अश्विनचे ​​इतके फुटेज पाहिले की माझी बायको वेडीच झाली" 

नवी दिल्ली : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या मालिकेतील पहिला सामना जिंकून भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांच्या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव झाला. त्यामुळे दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनच्या खेळीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. 

आकडेवारीनुसार, रविचंद्रन अश्विन हा भारताचा दुसरा महान कसोटी गोलंदाज आहे. 457 बळींसह अश्विन हा कसोटीत सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनच्या फिरकीची भीती नेहमीच ऑस्ट्रेलियन संघाच्या मनात असते. याचाच प्रत्यय नागपूर कसोटीपूर्वी सराव सत्रात पाहायला मिळाला, जेव्हा कांगारू संघाने अश्विनला सामोरे जाण्यासाठी भारतीय देशांतर्गत गोलंदाज महेश पिठियाला नेटमध्ये बोलावले होते. 

अश्विनकडून खूप काही शिकलो - नॅथन लायन
लक्षणीय बाब म्हणजे अश्विनची केवळ गोलंदाजीच नाही तर फलंदाजी देखील प्रभावी असल्याचे ऑस्ट्रेलियन फिरकीपटूने सांगितले आहे. ऑस्ट्रेलियाचा खेळाडू नॅथन लायनने सांगितले की, त्याने आपले करिअर सुरू करण्यापूर्वी अश्विनचे ​​बरेच फुटेज पाहिले होते आणि त्याच्याकडून बरेच काही शिकले असून अजूनही शिकत आहे. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना लायनने अश्विनबद्दल बोलताना खुलासा केला की, त्याने देशासाठी खेळण्यापूर्वी अश्विनच्या गोलंदाजीचा सखोल अभ्यास केला होता.

"मी अश्विनविरूद्ध स्वत:ला सिद्ध करायला जात आहे. ज्यापद्धतीने अश्विन पुढे सरसावला आहे हे खूप कौतुकास्पद आहे आणि त्याचा विक्रम हे सगळं काही सांगतो. खरंच मी एक खूप वेगळा गोलंदाज आहे. मी इथे येण्यापूर्वी बऱ्याचवेळा अश्विनचे फुटेज पाहिले आहेत. मी घरी लॅपटॉपसमोर बसून माझ्या बायकोला वेड लागेपर्यंत फुटेज पाहण्यात बराच वेळ घालवला. हे सर्व शिकण्याबद्दल आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपण सतत शिकत असतो आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतो", असे नॅथन लायनने अधिक सांगितले. याशिवाय रविचंद्रन अश्विनने खूप काही शिकवले असल्याचे देखील लायनने यावेळी स्पष्ट केले.

ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ - 
रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, श्रेयस अय्यर, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव. 

भारत दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाचा संघ - 
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), ॲश्टन आगर, स्कॉट बोलंड, ॲलेक्स कॅरी, डेव्हिड वॉर्नर, कॅमेरून ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन. 

बॉर्डर-गावस्कर करंडक स्पर्धेसाठी मास्टरकार्ड ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा नागपुरात 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथे तीन कसोटी सामने खेळणार आहे. कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघाच्या घरच्या मालिकेचा शेवट वन डे मालिकेतून होणार आहे. 

ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. 9 ते 13 फेब्रुवारी, पहिला कसोटी सामना, नागपूर
  2. 17 ते 21 फ्रेब्रुवारी, दुसरा कसोटी सामना, दिल्ली
  3. 1 ते 5 मार्च, तिसरा कसोटी सामना, इंदूर 
  4. 9 ते 13 मार्च, चौथा कसोटी सामना, अहमदाबाद

 
ऑस्ट्रेलिया विरूद्ध भारत वन डे मालिका

  1. 17 मार्च, शुक्रवार, पहिला सामना, मुंबई 
  2. 19 मार्च, रविवार, दुसरा सामना, विझाग
  3. 22 मार्च, बुधवार, तिसरा सामना, चेन्नई

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

Web Title: I watched so much footage of Ashwin on my laptop that my wife went crazy, said Australian spinner Nathan Lyon  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.