Join us  

ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार; डेव्हिड वॉर्नरची मोठी घोषणा

वॉर्नरने अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 8:45 PM

Open in App

ऑस्ट्रेलियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरने अलीकडेच त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळला. वॉर्नरने वन डे आणि कसोटीमधून निवृत्ती घेतल्यानंतर ट्वेंटी-२० क्रिकेटला देखील रामराम करणार असल्याचे संकेत दिले आहेत. ट्वेंटी-२० विश्वचषक २०२४ नंतर वॉर्नर क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट खेळणार नाही. वॉर्नरने वन डे कारकिर्दीतील अखेरचा सामना भारताविरूद्ध तर कसोटीतील शेवटचा सामना पाकिस्तानविरूद्ध खेळला. 

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यातील चमकदार कामगिरीनंतर आपल्या भावना व्यक्त करताना वॉर्नरने आगामी विश्वचषकात सहभागी होण्यासाठी आणि जागतिक स्तरावर आपली शानदार कारकीर्द संपवण्याची उत्सुकता व्यक्त केली. एकूणच ट्वेंटी-२० विश्वचषकानंतर निवृत्त होत असल्याचे संकेत त्याने दिले आहेत. वॉर्नरने शुक्रवारी वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात ३६ चेंडूत ७० धावांची खेळी केली. या खेळीमुळे वॉर्नरला सर्वोत्तम खेळाडूच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ट्वेंटी-२० क्रिकेट खेळणार - वॉर्नर सामन्यानंतर वॉर्नर म्हणाला की, फलंदाजीसाठी चांगली खेळपट्टी होती. त्यामुळे मी धावा करताना याचा पुरेपूर फायदा घेतला. मला ट्वेंटी-२० विश्वचषक खेळायचा आहे आणि तिथेच माझी ट्वेंटी-२० कारकीर्द संपवायची आहे. वेस्ट इंडिजच्या दमदार कामगिरीनंतरही ऑस्ट्रेलियाने ११ धावांनी विजय मिळवला.

वॉर्नरची वन डे कारकीर्दवॉर्नरने अलीकडेच वन डे क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. डेव्हिड वॉर्नरचा शेवटचा वन डे सामना २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. त्या सामन्यात तो ३ चेंडूत ७ धावा करून बाद झाला होता. त्याच्या वन डे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल भाष्य करायचे झाले तर, त्याने १६१ सामन्यांच्या १५९ डावांमध्ये एकूण ६९३२ धावा केल्या. या फॉरमॅटमध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या १७९ राहिली. त्याने ४५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या. वन डे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून २२ शतके आणि ३३ अर्धशतके झाली आहेत. त्याला वन डे कारकिर्दीत ७३३ चौकार आणि १३० षटकार मारण्यात यश आले. 

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2024आॅस्ट्रेलियाटी-20 क्रिकेट