Join us
Daily Top 2Weekly Top 5

विराट कोहलीला घाबरत नाही; पाकिस्तानच्या 17 वर्षीय गोलंदाजानं दिलं चॅलेंज

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 12:46 IST

Open in App

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज आहे. त्यामुळे जगभरातील गोलंदाजांमध्ये त्याची धास्ती आहे. पण, पाकिस्तानचा 17 वर्षीय गोलंदाज नसीम शाह हा विराटला गोलंदाजी करण्यासाठी उत्सुक आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तान सामना कधी होतो, याची त्याला उत्सुकता लागली आहे. विराटची अन्य गोलंदाजांवर दहशत असली तरी नसीम मात्र विराटला घाबरत नसल्याचे म्हणत आहे. विराटचा आदर आहे, परंतु त्याला घाबरत नसल्याचे मत त्यानं व्यक्त केलं आहे.

तो म्हणाला,''भारताविरुद्ध मी चांगली गोलंदाजी करेन, अशी मला आशा आहे. पण, त्या संधीची वाट पाहतोय आणि मी चाहत्यांना निराश नक्की करणार नाही. मी विराटचा आदर करतो, परंतु त्याला घाबरत नाही. सर्वोत्तम फलंदाजाला गोलंदाजी करणं, हे नेहमी आव्हानात्मक असते, परंतु तेथेच तुम्हाला तुमची कामगिरी उंचावण्याची संधी असते. त्यामुळे मला विराटविरुद्ध खेळायचे आहे.''

''भारतविरुद्ध पाकिस्तान हा सामना स्पेशल आहे आणि या सामन्यातून एक तर खेळाडू नायक बनतात किंवा खलनायक. भारत-पाक सामना क्वचितच होतो. त्यामुळे ही संधी मला कधी मिळेल, याची वाट पाहत आहे,''असे तो म्हणाला. नसीमनं 16व्या वर्षी पाकिस्तानच्या कसोटी संघातून पदार्पण केलं. त्यानंतर श्रीलंकेविरुद्धच्या  मालिकेत त्यानं 5 विकेट्स घेतल्या आणि बांगलादेशविरुद्ध हॅटट्रिक घेत इतिहास घडवला. कसोटीत हॅटट्रिक घेणारा तो युवा गोलंदाज ठरला.  

WWE स्टार खेळाडूनं घेतला जगाचा निरोप; दोन महिन्यांपूर्वी झालेलं पत्नीच निधन 

नताशाच्या 'बेबी शॉवर'ला हार्दिक पांड्याची फुल्ल टू धमाल; फोटो व्हायरल 

हार्दिक-नताशा यांनी Good News दिली, विरुष्काची डोकेदुखी वाढली; पाहा भन्नाट मीम्स!

टॅग्स :विराट कोहलीपाकिस्तान