Join us

Gautam Gambhir Jay Shah, IND vs SL: गौतम गंभीरने पहिल्याच पत्रकार परिषदेत केला जय शाह यांच्या नावाचा उल्लेख, म्हणाला...

३ T20 आणि ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आज भारतीय संघ श्रीलंकेला झाला रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 19:20 IST

Open in App

Gautam Gambhir Jay Shah, IND vs SL: भारतीय संघ सोमवारी श्रीलंकेला रवाना झाला. या दौऱ्यात भारत श्रीलंकेविरूद्ध तीन सामन्यांची टी२० आणि वनडे मालिका खेळणार आहे. या आधी संघाचे नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांने मुख्य निवडकर्ता अजित आगरकर याच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी भारतीय क्रिकेटचे भविष्य यावर त्याने भाष्य केले आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्याशी त्याचे कशाप्रकारचे नाते आहे याबद्दलही स्पष्ट केले.

"माझी जय शाह यांच्याशी खूप चांगली मैत्री आहे. आम्ही बराच काळ एकत्र काम केले आहे. आमची मते भिन्न आहेत अशा अफवा मी बऱ्याच दिवसांपासून ऐकत आहे. पण आम्ही त्या गोष्टींबाबत स्पष्टीकरण देण्यात वेळ घालवणार नाही. कारण भारतीय क्रिकेटचा विकास अधिक महत्त्वाचा आहे. भारतीय क्रिकेटचे भले होणे अधिक महत्त्वाचे आहे, एकटा गौतम गंभीर महत्त्वाचा नाही. आपण सर्वांनी भारतीय क्रिकेटला पुढे नेण्याची गरज आहे," असे अतिशय स्पष्ट मत गौतम गंभीर याने मीडियासमोर बोलताना मांडले.

शुबमन गिलच्या भवितव्यावर बोलताना गंभीरने मोठे विधान केले. मागील काही कालावधीपासून शुबमन गिल संघर्ष करत आहे. त्यामुळे त्याला संघात जागा मिळवणे कठीण झाले. पण, त्यानंतर संधी मिळताच त्याने साजेशी खेळी केली.  त्यामुळे शुबमन गिलचे भवितव्य काय हा प्रश्न उद्भवतो. यावर गंभीर म्हणाला की, गिल भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळेल, तर मोहम्मद शमी बांगलादेशविरूद्धच्या कसोटी मालिकेतून पुनरागमन करेल.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाजय शाहगौतम गंभीरभारतीय क्रिकेट संघ