IND vs SA 3rd T20I - भारतीय संघाने ट्वेंटी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवण्यात अखेर यश मिळवले. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात भारताकडून अप्रतिम सांघिक खेळ झाला. सूर्यकुमार यादवचे शतक अन् यशस्वी जैस्वालच्या अर्धशतकी खेळीनंतर कुलदीप यावदने ५ विकेट्स घेतल्या आणि भारताला १०६ धावांनी दणदणीत विजय मिळवून दिला. पहिला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता, तर दुसऱ्या सामन्यात आफ्रिकेने विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली होती. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने तिसऱ्या सामन्यात दमदार खेळ करून संयुक्त जेतेपद पटकावले.
कुलदीप यादवचा वर्ल्ड रेकॉर्ड! बर्थ डे बॉयने केली कमाल, असा विक्रम कधीच झाला नव्हता
पण, या सामन्यातील शतकवीर सूर्यकुमार यादवचा पाय क्षेत्ररक्षण करताना मुरगळला आणि त्याला उचलून मैदानाबाहेर नेण्यात आले. या दुखापतीनंतर सूर्यकुमार पुन्हा मैदानावर परतलाच नाही. दक्षिण आफ्रिकेच्या डावातील तिसऱ्या षटकात सूर्याला ही दुखापत झाली. पाय मुरगळल्याने तो मैदानावर वेदनेने विव्हळत होता. त्याला चालताही येत नव्हते आणि त्यामुळे त्याला उचलून बाहेर नेण्यात आले. सामन्यानंतर सूर्याने त्याच्या दुखापतीबाबर मेजर अपडेट्स दिले आहेत.
आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक ४ शतकांच्या ग्लेन मॅक्सवेल व रोहित शर्मा यांच्या विक्रमाशी सूर्यकुमारने बरोबरी केली. त्याने इंग्लंडचा माजी कर्णधार इयॉन मॉर्गन याचा आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या किंवा त्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना सर्वाधिक फिफ्टी प्लसचा विक्रम मोडला. सूर्याने ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांसह १०० धावा केल्या.