दोहा येथील ACC च्या आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. जितेश शर्माच्या नेतृत्वाखालील भारत 'अ' संघाने युएईविरुद्धच्या सामन्यात १४८ धावांनी विजय मिळवत स्पर्धेत धमाकेदार सलामी दिली. पण पाकिस्तान शाहीन्स अर्थात पाक 'अ' संघाविरुद्ध टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावली. भारतीय संघाविरुद्धच्या विजयासह पाकिस्तानच्या संघाने सेमीफायनलच तिकीट बूक केलं आहे. इथं एक नजर टाकुयात भारतीय संघासाठी कसे असेल सेमीच समीकरण यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानच्या संघाला मिळालं सेमीचं तिकीट; भारतीय संघही आहे प्रबळ दावेदार
आशिया कप रायझिंग स्टार्स २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील दुसऱ्या लढतीत पाकिस्तान 'अ' संघाने भारतीय 'अ' संघाला ८ विकेट्सने पराभूत करत सेमीफायनल गाठली. या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानसह युएई आणि ओमानचा संघ 'ब' गटात आहे. १८ नोव्हेंबरला भारतीय संघ ओमान विरुद्ध या स्पर्धेतील आपला तिसरा आणि अखेरचा सामना खेळणार आहे. या संघाने पाक विरुद्धच्या सामन्यातील पराभवानंतर युएई विरुद्धच्या लढतीत विजय नोंदवत २ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
'ब' गटातून एका जागेसाठी दोन संघात स्पर्धा
एका बाजूला 'ब' गटातून पाकिस्तानचा संघ सेमीसाठी पात्र ठरला आहे. दुसऱ्या बाजूला युएईचा संघ सलग दोन पराभवासह सेमीच्या शर्यतीतून आउट झाला आहे. भारतीय संघाने दोन सामन्यानंतर एक पराभव आणि एक विजय मिळवत २ गुण कमावले आहेत. ओमानचा संघच्या खात्यातही एक विजय आणि एका पराभवासह २ गुण जमा आहेत. त्यामुळे या दोन्ही संघात १८ नोव्हेंबरला रंगणारा सामन्याला क्वार्टर फायनलचं स्वरुप आलं आहे. जो संघ जिंकेल तो या गटातून सेमीफायनलमध्ये एन्ट्री मारेल.
'अ' गटातून कोण मारेल सेमीत एन्ट्री?
या स्पर्धेत 'अ' गटात बांगलादेश 'अ', अफगाणिस्तान 'अ', श्रीलंका 'अ' आणि हाँगकाँगच्या संघाचा समावेश आहे. बांगलादेश आणि अफगाणिस्तानच्या संघाने प्रत्येकी एक एक सामना जिंकला असून श्रीलंका आणि हाँगकाँगच्या संघाला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. प्रत्येकी ३ सामन्यानंतर अव्वल दोन संघ या गटातून सेमीफायनलमध्ये पोहचतील.