ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा आघाडीचा फलंदाज श्रेयस अय्यर हा दुखापतग्रस्त झाला होतो. श्रेयसवर सध्या सिडनी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिथे श्रेयसला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स कॅरी याचा झेल पकडताना श्रेयसला दुखापत झाली होती. दरम्यान, आता बीसीसीआयनेश्रेयस अय्यरला झालेल्या दुखापतीच्या गांभीर्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
बीसीसीआयने या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हणले आहे की, सिडनीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना श्रेयस अय्यरच्या डाव्या बरगडीच्या खालील भागाला दुखापत झाली होती. त्याला पुढील तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता तिथे करण्यात आलेल्या स्कॅनमध्ये त्याच्या प्लिहामध्ये (Spleen) कट झालेला दिसला.
सध्या श्रेयस अय्यरवर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्याच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा होत आहे. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक सिडनी आणि भारतातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, भारतीय डॉक्टर श्रेयस अय्यर याच्यासोबत सिडनीमध्ये राहणार आहेत. तसेत त्याच्या प्रकृतीत दररोज होत असलेल्या सुधारणेचं मूल्यांकन करणार आहेत, असेही बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटले आहे.
दरम्यान, श्रेयस अय्यर एक आठवड्यापर्यंत सिडनी येथील रुग्णालयात राहण्याची शक्यता आहे. तसेच श्रेयस अय्यर किती दिवस मैदानाबाहेर राहणार हे पुढच्या काही दिवसांमध्ये निश्चित होणार आहे. मात्र बीसीसीआयने त्याच्या पुनरागमनााबबत अद्याप कुठलीही कालमर्यादा निश्चित केलेली नाही.
Web Summary : Shreyas Iyer injured his left rib during an Australia ODI. Scans revealed a spleen cut. He's stable and recovering in a Sydney hospital. BCCI monitors his progress with experts and hasn't set a return timeline. He'll remain hospitalized for about a week.
Web Summary : ऑस्ट्रेलिया वनडे में श्रेयस अय्यर की बाईं पसली में चोट लगी। स्कैन में प्लीहा में कट दिखा। सिडनी के अस्पताल में स्थिर हैं। बीसीसीआई विशेषज्ञों के साथ निगरानी कर रहा है और वापसी का समय निर्धारित नहीं किया है। लगभग एक सप्ताह तक अस्पताल में रहेंगे।