IND vs NZ Test Series: भारत विरुद्ध न्यूझीलंडदरम्यान दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरूवात झाली. पहिल्या सामन्यात भारतीय संघानं टॉस जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. कानपूरमध्ये सामना सुरू झाल्यानंतर थोडा वेल धुकं दिसत होतं. अशात समोर स्पष्टही दिसत नव्हतं. भारताचा माजी फलंदाज वसीम जाफरनं यावरून मजेशीर ट्वीट केलं आहे.
जाफरनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर एक फोटो शे्र केला आहे. तसंच त्याच्या वरच्या भागात कसोटी सामन्याचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यानं 'धुवां धुवां था वह समां' एक कॅप्शनही लिहिलं आहे. यासोबतच त्यानं फोटोच्या अर्ध्या भागात 'हिंदुस्तान में क्या चल रहा है' असं लिहिलेला मेसेज पोस्ट केला आहे. यामध्ये पाकिस्तानचा सैनिक काय सुरू आहे असं विचारताना दिसतोय. यावर भारताचा जवान 'हिंदुस्तान में तो फॉग चल रहा है' असं म्हणताना दिसत आहे. जाफरच्या या ट्वीटवर अनेकांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
अजिंक्य रहाणे ( Ajikya Rahane) आणि राहुल द्रविड ( Rahul Dravid) जोडी नव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी आज मैदानावर उतरली. न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील ( WTC) दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडला आव्हान देण्यासाठी सज्ज झाली आहे. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, मोहम्मद शमी आदी काही प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत टीम इंडिया किवींचा सामना करणार आहे. याआधीही अजिंक्यच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी धुळ चारण्याचा पराक्रम केला आहे आणि याही मालिकेत त्याच्या पुनरावृत्तीची अपेक्षा आहे.