Rahul Dravid Injury Update, Rajasthan Royals : IPL 2025 सुरू होण्यासाठी आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्याआधी सर्वच संघ आपल्या खेळाडूंच्या फिटनेसवर लक्ष देत आहेत. मुंबई इंडियन्सचा जसप्रीत बुमराह आणि लखनौ सुपर जायंट्सचा मयंक यादव यांना दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार असल्याची मिळाली आहे. खेळाडूंच्या दुखापतींबाबत चर्चा सुरु असताना राजस्थान रॉयल्समध्ये थेट कोचच दुखापतग्रस्त झाला. राजस्थानचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड एका किरकोळ दुर्घटनेमुळे जखमी झाला. त्यामुळे त्याच्या पायावर प्लास्टर चढवण्यात आले. पण असे असतानाही तो मैदानावर आला आणि मार्गदर्शकाची भूमिका पार पाडली.
राहुल द्रविडच्या जिद्दीला सलाम !
राजस्थान रॉयल्सने द्रविडचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यात दिसले की, द्रविड बग्गीतून मैदानात आला. त्यानंतर त्याने कुबड्यांच्या सहाय्याने मैदानात फेरफटका मारला आणि सर्व खेळाडूंशी ट्रेनिंग घेत संवाद साधला. यशस्वी जैस्वाल, रियान पराग यांसारख्या अनुभवी खेळाडूंना त्याने काही टिप्सदेखील दिल्या. तसेच इतर सपोर्ट स्टाफशीही द्रविडने गप्पा मारल्या आणि संघाचं वातावरण एकदम हसरं खेळतं ठेवलं. पाहा व्हिडीओ-
द्रविडला नेमकं काय झालंय?
द्रविडच्या पायाला दुखापत झालेली आहे. राजस्थान रॉयल्सच्या म्हणण्यानुसार, द्रविडला क्रिकेट खेळताना दुखापत झाली आहे. राहुल द्रविडच्या दुखापतीबद्दल माहिती देताना राजस्थान रॉयल्सने इंस्टाग्रामवर लिहिले होते की, बंगळुरूमध्ये क्रिकेट खेळताना त्याला दुखापत झाली आहे. राहुल द्रविड शक्य तितक्या लवकर तंदुरूस्त होण्याचा प्रयत्न करत आहे. याचदरम्यान, बुधवारी जयपूरमध्ये येऊन तो संघाच्या ताफ्यात सामील होईल.
त्यानुसार, द्रविडने बुधवारपासून खेळाडूंसोबत मैदानात हजेरी लावायला सुरुवात केली. गेल्या हंगामात राजस्थान रॉयल्स संघाने चांगला खेळ केला होता. हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या क्रमांकावर होता पण अंतिम फेरीत पोहोचू शकला नाही. यावेळी राजस्थानला आशा आहे की द्रविडच्या मार्गदर्शनाखाली संघ अधिक चांगली कामगिरी करेल. २००८ मध्ये राजस्थान रॉयल्सने आयपीएल जिंकले होते, त्यानंतर त्यांना विजेतेपद मिळालेले नाही. तशातच, यंदा IPL इतिहासातील सर्वात तरुण म्हणजेच १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशीदेखील या संघाकडून खेळणार आहे.
Web Title: Hats Off to Rahul Dravid commitment as he came to the field with crutches after Injury Rajasthan Royals Training Session
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.