शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)

BCCI नं शेअर केला टीम इंडियाच्या सराव सत्रातील खास व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 12:13 IST2025-06-30T11:58:49+5:302025-06-30T12:13:26+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Harpreet Brar Reveals How He became Part Of India Practice Sessions At In Birmingham After Shubman Gill Text Message Watch Video | शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)

शुबमन गिलचा एक मेसेज अन् तो सासरवाडीतून थेट टीम इंडियाच्या ताफ्यात (VIDEO)

इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरी लढत बर्मिंघमच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. २ जुलै पासून रंगणाऱ्या या सामन्यासाठी भारतीय संघ कसून सराव करताना दिसतोय. बीसीसीआयने एजबेस्टन स्टेडियमवरील भारतीय खेळाडूंच्या सराव सत्रातील एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये नव्या खेळाडूंची भारतीय संघाच्या ताफ्यात एन्ट्री झाल्याचे दिसून येते. एक पठ्ठ्या तर शुबमन गिलच्या एका मेसेजवर सासरवाडीतून थेट मैदानात पोहचल्याचे पाहायला मिळाले. कोण आहे तो खेळाडू? जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर स्टोरी

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

BCCI नं शेअर केला सराव सत्रातील खास व्हिडिओ

बीसीसीआयने जो व्हिडिओ शेअर केलाय त्यात पंजाबी खेळाडूंची खास झलक पाहायला मिळते. इंग्लंड दौऱ्यावर भारतीय कसोटी संघातून पदार्पणाच्या प्रतिक्षेत असलेल्या अर्शदीप सिंग शिवाय आयपीएलमध्ये पंजाब किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसलेला हरप्रीत ब्रार आणि आतापर्यंत टीम इडियात एकही संधी न मिळालेला जगदीश सिंग संधू नेट बॉलरच्या रुपात टीम इंडियाच्या ताफ्यात सामील झाल्याचे दिसून आले.

ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की

...अन् सासरवाडीतून तो  थेट टीम इंडियाच्या ताफ्यात सामील झाला

हरमनप्रीत ब्रार हा काही इंग्लंड दौऱ्यावरील टीम इंडियाचा भाग नाही. शुबमन गिलच्या एका मेसेजवर तो टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिस सेशनमध्ये सहभागी झाला. पंजाबी फिरकीपटूनं स्वत:च याबद्दल खुलासा केला आहे. तो म्हणाला की, माझ्या पत्नीचं घर इथं स्विंडनमध्ये आहे.  बर्मिंघमच्या मैदानात यायला फक्त दिड तास लागतो. शुबमन गिलसोबत गप्पा गोष्टी सुरु होत्या. मला त्याचा मेसेज आला अन् मी लगेच इथं प्रॅक्टिसला आलो, असे तो म्हणालाय. सासरवाडीतून तो थेट टीम इंडियाच्या ताफ्यात सामील झाल्याचे पाहायला मिळाले.

भारतीय संघ मालिकेत पिछाडीवर

इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने फलंदाजीत फर्स्ट क्लास शो दाखवला.  पाच शतकांसह आतापर्यंत कोणत्याही संघाला न जमलेला पराक्रम करून दाखवत टीम इंडियाने लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात इतिहास रचला. पण या ऐतिहासिक कामगिरीनंतरही शुबमन गिलच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाची सुरुवात पराभवाने झाली. पाच सामन्यांच्या मालिकेत ०-१ अशा पिछाडीवर असलेला भारतीय संघ बर्मिंघमचं मैदान मारून यजमानांशी बरोबरी करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

 

Web Title: Harpreet Brar Reveals How He became Part Of India Practice Sessions At In Birmingham After Shubman Gill Text Message Watch Video