मुंबई - ऑस्ट्रेलियात रंगणाऱ्या महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारताच्या महिला संघाची घोषणा आज करण्यात आली असून, हमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी स्मृती मंधानाकडे सोपवण्यात आली आहे. महिलांची टी-20 विश्वचषक स्पर्धा 21 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. 
या विश्वचषक स्पर्धेत यजमान आणि गतविजेत्या असलेल्या ऑस्ट्रेलियासह, इंग्लंड, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि थायलंड हे संघ सहभागी होणार आहेत. महिलांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी  निवडण्यात आलेला भारताचा महिला संघ पुढीलप्रमाणे आहे. 
भारतीय महिला संघ -  हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार),  शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिक्स, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, वेदा कृष्णमूर्ती, रिचा घोष, तानिया भाटिया, पूनम यादव, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड, शिखा पांडे, पूजा वस्तरकर, अरुंधती रेड्डी.