Harmanpreet Kaur On India vs Pakistan ICC Women's ODI World Cup : आशिया चषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला सेट झालाय. या स्पर्धेत तिसऱ्यांदा आणि इतिहासात पहिल्यांदा हे दोन्ही संघ एकेमेकांना भिडणार आहेत. इथंच हा सिलसिला संपणार नाही. कारण या मेगा फायनलनंतर महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाकिस्तान यांच्यातील सामना रंगल्याचे पाहायला मिळणार आहे. महिला वनडे वर्ल्ड कपच्या मोहिमेला सुरुवात करण्याआधी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्याचे पाहायला मिळाले. इथं एक नजर टाकुयात वर्ल्ड कपससह या स्पर्धेतील IND vs PAK यांच्यातील लढतीबद्दल ती नेमकं ती काय म्हणाली? यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पहिला सामना महत्त्वाचा
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत हरमनप्रीत कौर म्हणाली की, सध्याच्या घडीला आम्ही सलामीच्या लढतीवर लक्षकेंदीत करत आहोत. कोणत्याही संघासाठी मोठ्या स्पर्धेतील पहिला सामना महत्त्वपूर्ण असतो. स्पर्धेतील प्रत्येक संघात जेतेपद मिळवण्याची क्षमता आहे. आम्ही फक्त अन् फक्त उत्तम क्रिकेट खेळण्यावर भर देऊ.
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
IND W vs PAK W हायहोल्टेज लढतीबद्दल काय म्हणाली हरमनप्रीत कौर?
महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना ५ ऑक्टोबरला कोलंबो येथे रंगणार आहे. भारत-पाकिस्तान क्रिकेट मंडळांमध्ये झालेल्या करारानुसार पाकिस्तान संघाचे सर्व सामने श्रीलंकेतील मैदानात खेळवण्यात येणार आहेत. आशिया कप २०२५ दरम्यान रंगलेल्या भारत-पाकिस्तान वादाच्या पार्श्वभूमीवर आगामी आयसीसी स्पर्धेबाबत हरमनप्रीत कौरला प्रश्न विचारण्यात आला. “आम्ही ड्रेसिंग रूममध्ये या गोष्टींची चर्चा सुद्धा करत नाही. आम्ही फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहोत आणि आमचं लक्ष केवळ क्रिकेटवरच आहे,” असं ती म्हणाली.
महिला वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत कधी अन् कुठं रंगणार भारत-पाक सामना?
भारतीय संघ ३० सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्धच्या लढतीनं वनडे वर्ल्ड कपच्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. हा सामना गुवाहटीच्या मैदानात खेळवण्यात येणा . भारत-पाक यांच्यातील सामना हा श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. महिला क्रिकेटमध्ये पाकिस्तानसमोर भारतीय संघाचा दबदबा राहिला आहे. दोन्ही संघात आतापर्यंत ११ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यात एकदाही पाकिस्तानला विजय मिळवता आलेला नाही.