PAK vs AFG : चेंडू टाकला की गोळी! पाकिस्तानी गोलंदाजाच्या वेगासमोर राशिद खान 'चीतपट'

PAK vs AFG 1st ODI : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2023 12:32 PM2023-08-23T12:32:20+5:302023-08-23T12:32:46+5:30

whatsapp join usJoin us
Haris Rauf cleans up Rashid Khan with a 146kmph delivery in afg vs pak 1st odi match  | PAK vs AFG : चेंडू टाकला की गोळी! पाकिस्तानी गोलंदाजाच्या वेगासमोर राशिद खान 'चीतपट'

PAK vs AFG : चेंडू टाकला की गोळी! पाकिस्तानी गोलंदाजाच्या वेगासमोर राशिद खान 'चीतपट'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

haris rauf bowling speed : सध्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात वन डे मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिला सामना जिंकून बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तानी संघाने विजयी सलामी दिली आहे. ५० षटकांच्या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ केवळ ५९ धावांवर तंबूत परतला. हारिस रौफच्या घातक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला घाम फुटला. खरं तर पाकिस्तानच्या रौफने पाच बळी घेऊन अफगाणिस्तानच्या फलंदाजीची कंबर मोडली. हारिसने गोळीगत टाकलेल्या चेंडूनं राशिद खान देखील अवाक् झाला. १४६ प्रति ताशी वेगाने चेंडू टाकून रौफने राशिद खानचा त्रिफळा उडवला. 

दरम्यान, पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज हारिस रौफ, शाहीन आफ्रिदी आणि नसीम शाह या त्रिकुटाने अफगाणिस्तानची पळता भुई थोडी केली. पाकिस्तानच्या घातक गोलंदाजीसमोर प्रतिस्पर्धी संघ केवळ ५९ धावांवर सर्वबाद झाला अन् पाकिस्तानने १४२ धावांनी मोठा विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना बाबर आझमच्या संघाने ४७.१ षटकांत सर्वबाद २०१ धावा केल्या. अफगाणिस्तानच्या फिरकीसमोर इमाम-उल-हक वगळता एकाही पाकिस्तानी खेळाडूचा टिकाव लागला नाही. कर्णधार बाबर खातेही न उघडता तंबूत परतला. पाकिस्तानकडून इमामने सर्वाधिक (६१) धावा केल्या, तर शादाब खानला (३९) धावा करण्यात यश आलं. याव्यतिरिक्त बाबर आझम (०), फखर झमान (२), मोहम्मद रिझवान (२१), आगा सलमान (७), इफ्तिखार अहमद (३०), उसामा मीर (२), शाहीन आफ्रिदी (२), हारिस रौफ (१) आणि नसीम शाहने नाबाद (१८) धावा केल्या. 

अफगाणिस्तानच्या फलंदाजांना अपयश आलं असलं तरी त्यांच्या गोलंदाजांनी मात्र त्यांची जबाबदारी चोख पार पाडली. अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंनी कमाल करत पाकिस्तानी संघाला आपल्या जाळ्यात फसवलं. मुजीब उर रहमानने ३३ धावा देत सर्वाधिक (३) बळी घेतले, तर मोहम्मद नबी आणि राशिद खानने (२) बळी पटकावले. याशिवाय फजलहक फारूक आणि रहमत शाह जुर्माते यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आलं.

पाकिस्तानचा मोठा विजय 
पाकिस्तानने दिलेल्या २०२ धावांचा पाठलाग करताना अफगाणिस्तानच्या संघाला घाम फुटला. हारिस रौफने निम्मा संघ तंबूत पाठवून यजमानांना मोठे धक्के दिले. पाकिस्तानकडून हारिसने सर्वाधिक (५) बळी घेतले, तर शाहीन आफ्रिदीला (२) बळी घेण्यात यश आले. याशिवाय नसीम शाह (१) आणि शादाब खानने (१) बळी घेऊन अफगाणिस्तानला अवघ्या ५९ धावांवर सर्वबाद केले. अफगाणिस्तानने १९.२ षटकांत सर्वबाद केवळ ५९ धावा केल्या. विशेष बाब म्हणजे यजमान संघातील एकाही फलंदाजाला २० धावांचा आकडा गाठता आला नाही. सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाजने सर्वाधिक (१८) धावा केल्या, तर पाच फलंदाज खातेही न उघडता माघारी परतले. 

Web Title: Haris Rauf cleans up Rashid Khan with a 146kmph delivery in afg vs pak 1st odi match 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.