Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा 'लय भारी' - कपिल देव

अल्पावधीतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या हार्दिक पांड्याचे चौहुबाजूंनी कौतुक होत आहे. हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा सरस आसल्याचे सांगत माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 21:09 IST

Open in App

नवी दिल्ली - अल्पावधीतच भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात घर करणाऱ्या हार्दिक पांड्याचे चौहुबाजूंनी कौतुक होत आहे. हार्दिक पांड्याचा खेळ माझ्यापेक्षा सरस आसल्याचे सांगत माजी कर्णधार कपिल देव यांनी त्याच्यावर कौतुकाची थाप टाकली आहे. हार्दिकच्या भविष्याविषयी आताच अंदाज करणे म्हणजे घाई करण्यासारखे होईल. पण कष्ट केल्यास तो नक्की एक महान खेळाडू होऊ शकतो, असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला.कपिल देव यांनी त्याचं कौतुक करताना त्याला काही सल्लेही दिला आहे. ते म्हणाले की, हार्दिक पांड्या माझ्यापेक्षा चांगला खेळतो. मात्र त्याने स्वतःच्या खेळात बदलत्या परिस्थितीला अनुसरुन आणखी सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. हार्दिकला आणखी मेहनत घ्यावी लागेल. पांड्याच्या खेळीची तुलना नेहमीच इंग्लंडचा बेन स्टोक्स आणि भारताचा माजी खेळाडू कपिल देव यांच्यासोबत केली जाते. या पार्श्वभूमीवर एका पत्रकार परिषदेत हार्दिकच्या कामगिरीबाबत प्रतिक्रिया विचारली असता, कपिल देव यांनी हार्दिकचे कौतुक केले आणि त्याला आणखी मेहनत करण्याचा सल्ला दिला.

ऑस्ट्रेलियाविरोधातील चौथा वन-डे सामना 28 सप्टेंबरला बंगळुरुत होणार आहे. तर शेवटचा सामना 1 ऑक्टोबरला नागपूरमध्ये होणार आहे. हे दोन्ही सामने जिंकून ऑस्ट्रेलिया संघाला व्हाईटवॉश देण्याची संधी विराटच्या संघाला असणार आहे. तर दोन्ही सामन्यात भारताचा पराभव करत लाज राखण्याचा प्रयत्न कांगारु करतील. 

अष्टपैलू हार्दिक पांड्याने कारकिर्दीला नवी दिशा दिली - राहुल द्रविडअष्टपैलू हार्दिक पांड्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत परिस्थितीनुसार खेळ करताना आपल्या कारकिर्दीला नवी दिशी दिली, असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले. कोणत्याही क्रमांकावर खेळण्यासाठी मैदानात आल्याने परिस्थितीनुसार पांड्याने फलंदाजी आणि गोलंदाजी करताना संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, असेही द्रविड म्हणाला होता. 

टॅग्स :क्रिकेटबीसीसीआयराहूल द्रविडभारतीय क्रिकेट संघ