Hardik Pandya scripts history in Syed Mushtaq Ali Trophy : एका बाजूला पर्थ कसोटीत यशस्वी-केएल राहुलची दमदार इनिंग तर दुसऱ्या बाजूला IPL मेगा लिलावाची चर्चा सुरु असताना देशांतर्गत क्रिकेटच्या मैदानात तुफान फटकेबाजी करत हार्दिक लक्षवेधून घेतलं आहे. देशांतर्गत टी-२० क्रिकेटमधील क्लास इनिंगसह हार्दिक पांड्यानं हवा केली आहे. त्याने आपल्या धमाकेदार बॅटिंगच्या जोरावर संघाला विजय मिळवून दिला. एवढेच नाही तर जे आतापर्यंत कुणाला जमलं नाही तो पराक्रमही करून दाखवला आहे.
हार्दिक पांड्याची धमाकेदार इनिंग
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत हार्दिक पांड्याने ३५ चेंडूत नाबाद ७४ धावांची खेळी केली. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी तिलक वर्मा आणि श्रेयस अय्यरसह ६ फलंदाजांनी शतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. हार्दिक पांड्याला शतकी डाव साधता आला नसला तरी नाबाद ७४ धावांच्या खेळीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. हार्दिक पांड्यानं भाऊ क्रणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील बडोदा संघाकडून खेळताना ही धमाकेदार इनिंग खेळली आहे.
तुफान फटकेबाजीशिवाय बॉलिंगमध्येही सोडली छापगुजरात विरुद्ध बडोदा यांच्यातील लढतीत हार्दिक पांड्याने ६ चौकार आणि ५ उत्तुंग षटकाराच्या मदतीने ७४ धावांची नाबाद खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याने जवळपास २११ च्या स्ट्राइक रेटनं या धावा कुटल्या. पांड्याच्या या खेळीच्या जोरावर बडोदा संघाने हा सामना ५ विकेट्स राखून जिंकला. या सामन्यात ४ षटके गोलंदाजी करताना पांड्याने ३७ धावा खर्च करून आर्या देसाईच्या रुपात एक महत्त्वाची विकेट्सही मिळवली. ५००० धावांसह १०० प्लस विकेट्सचा खास रेकॉर्ड