Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

कमालीचा योगायोग, हार्दिकप्रमाणेच अर्शदीपनंही गमावली विकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2025 23:34 IST2025-09-19T23:32:39+5:302025-09-19T23:34:39+5:30

whatsapp join usJoin us
Hardik Pandya Run Out Non Striker End Sanju Samson Hit Shot India vs Oman Asia Cup 2025 | Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Oman T20 Asia Cup 2025 : आशिया चषक स्पर्धेत ओमान विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ धावांची 'बरसात' करेल अशी आशा होती. पण तसं घडलं नाही. टीम इंडियानं १८८ धावांसह यंदाच्या हंगामातील संयुक्तरित्या सर्वोत्तम धावसंख्या उभारली, पण ओमान विरुद्धच्या सामन्यात कॅप्टन सूर्यकुमार यादव सोडून सगळ्यांनी बॅटिंग केली, पण अभिषेक शर्मानं २०० पेक्षा अधिकच्या स्ट्राइक रेटनं केलेल्या धावा अन् संजू सॅमसनची अर्धशतकी खेळी वगळता कुणालाही नावाला साजेशी फटकेबाजी जमली नाही. त्यात हार्दिक पांड्या तर कमनशिबी ठरला. अवघ्या एका धावेवर तो विचित्र पद्धतीने रन आउट झाल्याचे पाहायला मिळाले.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

संजूचा फटका अन् पांड्या फसला!

भारतीय डावातील आठव्या षटकात संजू सॅमसन स्ट्राइकवर होता. ओमानच्या ताफ्यातील रामानंदीच्या गोलंदाजीवर त्याने थेट समोर फटका खेळला. हा चेंडू अडवण्यासाठी ओमानच्या गोलंदाजाने जीव तोडून कसरत केली अन् त्यात हार्दिक पांड्या फसला. गोलंदाजाच्या हाताला लाागून चेंडू स्टंपवर आदळला त्यावेळी पांड्यानं क्रीज सोडलं होतं. त्यामुळे त्याला नॉन स्ट्राइक एन्डवरूनच तंबूचा रस्ता धरावा लागला. फक्त एका चेंडूचा सामना करून एका धावेसह त्याची खेळीला ब्रेक लागला. 

IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?


कमालीचा योगायोग, हार्दिकप्रमाणेच अर्शदीपनंही गमावली विकेट

जितेन रामानंदी याच्या गोलंदाजीवर आधी हार्दिक पांड्या विचित्र पद्धतीने रन आउट झाला. कमालीचा योगायोग हा की, याच गोलंदाजाने अगदी 'कॉपी पेस्ट' पद्धतीने अर्शदीप सिंगलाही तंबूचा रस्ता दाखवला. तोही हार्दिक पांड्याप्रमाणे एक धाव करून नॉन स्ट्राइक एन्डवरून तंबूत परतल्याचे पाहायला मिळाले. 

ओमान विरुद्ध टीम इंडियाच्या बॅटिंगमध्ये अपेक्षित धमक नाही दिसली 

ओमान विरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. उप कर्णधार शुबमन गिल अवघ्या  ५ धावांची भर घालून माघारी फिरला. अभिषेक शर्मानं नेहमीप्रमाणे धमाकेदार सुरुवात केली. पण चांगल्या सुरुवातीनंतही तो अर्धशतकी खेळीचा डाव साधण्यात अपयशी ठरला. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १५ चेंडूत ३८ धावा केल्या. संजू सॅमसन याने ४५ चेंडूत केलेल्या ५६ धावांच्या खेळीशिवाय तिलक वर्मानं २९ धावांची खेळी केली.
 

Web Title: Hardik Pandya Run Out Non Striker End Sanju Samson Hit Shot India vs Oman Asia Cup 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.