Join us
Daily Top 2Weekly Top 5

हार्दिक पांड्यानं पोस्ट केला नताशासोबत रोमँटिक फोटो; नेटिझन्सनी पाडला कौतुकाचा पाऊस

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनण्याचा आनंद लपवू शकत नाही.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 12:55 IST

Open in App

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनण्याचा आनंद लपवू शकत नाही. त्यामुळे प्रेयसी नताशा स्टँकोव्हिचला खूश ठेवण्यासाठी हार्दिकची खटपट सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हार्दिकनं नताशाला स्पेशल गिफ्ट दिलं आणि नताशानं रोमँटिक फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. या दोघांनी पोस्टवर रोमँटिक मॅसेजही लिहिला आहे. हार्दिकनं काही दिवसांपूर्वी प्रेयसी नताशा प्रेग्नंट असल्याची माहिती सोशल मीडियावरून दिली होती. लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नताशा हार्दिकच्या कुटुंबीयांसोबतच राहत आहे. हार्दिकनं ही गुड न्यूज देताना गपचूप लग्नही केलं. त्यानं शेअर केलेल्या फोटोवरून तसा अंदाज बांधला जात आहे. शुक्रवारी हार्दिकनं नताशासोबचा रोमँटिक फोटो पोस्ट केला आणि चाहत्यांनी त्यावर कौतुकाचा पाऊस पाडला.

हार्दिक आणि नताशा यांनी वर्षाच्या सुरुवातीला दुबईत मोजक्याच मित्रांच्या साक्षीनं साखरपुडा केला. हार्दिकनं ही बातमी सोशल मीडियावरून सर्वांना सांगितली. हार्दिकच्या या सरप्राईजबद्दल त्याच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हते.  मुंबईत एका पार्टित या दोघांची भेट झाली आणि त्यानंतर दोघांमध्ये प्रेम झालं. नताशानं बॉलिवूडमधील काही चित्रपटांत काम केलं आहे. बाप होण्याची जबाबदारी पेलण्यासाठी हार्दिक सर्व प्रयत्न करताना दिसत आहे. तो आता स्वयंपाक शिकत आहे. त्यानं खास चिज बटर मसाला, ही डिश तयार केली होती.   

कसोटीत एकाच दिवशी पडल्या 27 विकेट्स; 132 वर्षांनंतरही वर्ल्ड रेकॉर्ड अबाधित 

Photo : हार्दिक पांड्याचं वडोदरातील लय भारी पेंटहाऊस; नजर हटणारच नाही! 

इंग्लंडच्या गोलंदाजानं गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी केली मोठी चूक अन् संपूर्ण संघावर आणलं कोरोना संकट! 

धक्कादायक : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू; क्रीडा विश्वात हळहळ

 

 

टॅग्स :हार्दिक पांड्यानताशा स्टँकोव्हिच