IPL 2025 MI vs GT Hardik Pandya Misses Run Out Chance : मुंबईतील वानखेडेच्या मैदानात रंगतदार झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या पदरी निराशा आली. गुजरात टायटन्सच्या संघाने डकवर्थ लुईसनुसार, मिळालेल्या धावांचा यशस्वी पाठलाग करत सामना ३ विकेट्स राखून जिंकला. पावसाच्या खेळामुळे कधी सामना गुजरातच्या बाजूनं तर कधी मुंबई इंडियन्सच्या बाजूनं झुकल्याचे पाहायला मिळाले. पण शेवटी गुजरातच्या संघानेच बाजी मारली. गुजरात १५ धावांचा बचाव करण्यासाठी हार्दिक पांड्याने दीपक चाहरवर भरवसा दाखवला. तो अपयशी ठरल्यावर कॅप्टन पांड्याला आपल्या जोरावर सामना पुन्हा फिरवण्याची एक संधीही निर्माण झाली होती. पण तो गडबडला अन् मुंबई इंडियन्सने शेवटच्या संधीसह मॅचसह दोन गुण गमावले. नेमकं काय घडलं? पांड्यानं ती चूक केली नसती तर हा सामना मुंबई इंडियन्सने कसा जिंकला असता ते इथं आपण जाणून घेऊयात.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पांड्यानं डायरेक्ट थ्रो मारला अन् ...
पावसाच्या व्यत्ययामुळे गुजरात टायटन्सच्या संघाला १९ षटकात १४७ धावांचे टार्गेट देण्यात आले होते. अखेरच्या ६ चेंडूत दीपक चाहरने एक चौकार आणि एक षटकार दिल्यामुळे सामना पुन्हा गुजरातसाठी सोपा झाला. पाचव्या चेंडूवर दीपक चाहरनं जेराल्ड कोएट्झीची विकेट घेतल्यावर शेवटच्या चेंडूवर गुजरातच्या संघाला एक धाव हवी होती. जेराल्ड कोएट्झी याची जागा घेण्यासाठी आलेल्या अर्शद खाननं मिड ऑफच्या दिशेनं चेंडू टोलवून एक धाव घेतली. चेंडू पांड्याच्या हाती गेल्यावर अर्शद निम्म्या क्रीजमध्ये पोहचल्याचे दिसत नव्हते. पण हार्दिक पांड्याने रन आउटची संधी गमावली.
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
पांड्यानं सूर्यावर भरवसा ठेवला असता तर शेवटच्या चेंडूवरही फिरली असती मॅच
अवघ्या १० मीटर एवढ्या अंतरावरून त्याला स्टंप टिपता आली नाही. मूळात डायरेक्ट थ्रो करण्याऐवजी सेन्स ऑफ ह्यूमर दाखवत त्याने सूर्यकुमार यादवकडे चेंडू दिला असता तरी अर्शद खान रन आउट झाला असता. सूर्या स्टंपच्या अगदी जवळ होता. पण पांड्याने भलतीकडेच चेंडू मारला. हे पाहिल्यावर पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? असा प्रश्नच क्रिकेट चाहत्याला पडेल. कारण रन आउटच्या रुपात ही विकेट मिळवत पाच चेंडूत गुजरातच्या बाजूनं फिरलेला सामना शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सच्या बाजूनं वळला असता. अन् सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये गेला असता. जसप्रीत बुमराहसमोर हा पेपर सोडवणं गुजरातला जमलही नसते. पण आता या गोष्ट फक्त जर तर पुरत्याच उरल्यात. कारण गुजरातनं संधीच सोनं करत सामना जिंकून दिमाखात आगेकूच केलीये.
Web Title: Hardik Pandya Misses Stumps As Gujarat Titans Titans Clinch Wankhede Thriller In Last Ball Drama Suryakurmar Yadav Mumabi Indians
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.