Join us
Daily Top 2Weekly Top 5

३ वर्षे मॅगी खाऊन दिवस काढणारे 'दो अनमोल रतन'! नीता अंबानींनी शेअर केला पांड्या बंधूंचा किस्सा

नीता अंबांनी यांनी शेअर केली पांड्या ब्रदर्ससंदर्भातील खास स्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:31 IST

Open in App

मुंबई इंडियन्स संघाच्या (MI) मालकिन नीता अंबानी यांनी हार्दिक पांड्या आणि  क्रुणाल पांड्या या हिरे कसे शोधलं अन् पुढे त्यांच्याबद्दल काय घडलं याचा रंजक किस्सा शेअर केला आहे. ज्यावेळी मी पहिल्यांदा भेटले त्यावेळी मला असं कळलं  की, तो दोघे तीन वर्ष फक्त मॅगी खाऊन दिवस ढकलत आहेत. पोटभर खाण्यासाठी  पैसे नसल्यामुळे ते मॅगीनं पोटाची खळगी भरायचे, अशा आशयाच्या शब्दांत नीता अंबांनी यांनी आयपीएलमुळे क्रिकेट जगताला मिळालेले 'दो अनमोल रतन' टायटल सूट व्हावी, अशी स्टोरी शेअर केली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

मुंबई इंडियन्सला 'हिऱ्यां'ची पारख 

आपला संघ युवा प्रतिभावंत खेळाडूंना घडवण्यासाठी पुढाकार घेण्याला प्राधान्य देतो, हे सांगताना नीता अंबांनी यांनी मुंबई इंडियन्सच्या टॅलेंट हंटमधील काही उदाहरणं दिली. त्यावेळी त्यांनी पांड्या बंधूंसह जसप्रीत बुमराह आणि मुंबईच्या ताफ्यातून दमदार खेळीच्या जोरावर टीम इंडियात एन्ट्री मारणाऱ्या तिलक वर्माचंही नाव घेतलं. मुंबई इंडियन्सचा संघ प्रतिभावंत खेळाडू शोधण्यात माहिर आहे, त्यामुळे संघानं विक्रमी पाचवेळा जेतेपद पटकावले. मुंबई इंडियन्स अशा खेळाडूवर पैसा लावते जे पुढे जाऊन भारतीय क्रिकेटमधील स्टार होतील. हार्दिक पांड्या आणि बुमराह ही त्याचीच उदाहरणे आहेत, असे त्या म्हणाल्या आहेत.  

...अन् ती दोन सडपातळ पोरं शिबिरात आणली; तीन वर्षे खात होते फक्त मॅगी नूडल्स

 मुंबई इंडियन्स संघ बांधणीसंदर्भात नीता अंबानी म्हणाल्या की, कमी बजटमध्ये प्रतिभावंत खेळाडूंची शोध मोहिम हा एक चॅलेंजिक टास्क असायचा. मी स्वत: रणजी ट्रॉफीसह देशांतर्गत क्रिकेटमधील सामने पाहायला जायचे. खेळाडू शोधण्यासाठी तयार केलेल पथकही सतत या शोधमोहिमेत असायचे. एक दिवस शोध मोहिमेतील टीमनं दोन सडपातळ नुलांना मुंबई इंडियन्सच्या शिबिरात आणलं. मी ज्यावेळी त्यांच्याशी बोलले त्यावेळी कळलं की, पैसे नसल्यामुळे ही दोघेही तीन वर्ष फक्त मॅगी नुडल्स खायचे. पण त्यांच्यात काहीतरी करून दाखवण्याची धमक आणि भूक होती. ते दोघे भाऊ म्हणजे हार्दिक पांड्या आणि क्रुणाल पांड्या. २०१५ च्या लिलावात मुंबई इंडियन्सनं हार्दिक पांड्यावर १० हजार अमेरिकन डॉलरची बोली लावली. आत तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. याचा अभिमान वाटतो, अशा शब्दांत नीता अंबांनी यांनी पांड्या बंधूंची भावूक स्टोरी शेअर करत मुंबई इंडियन्सच्या दूरदृष्टीची गोष्ट सांगितली आहे.बुमराहच्या जुन्या  गोष्टींना उजाळा, तिलक वर्मा नवा 'सितारा' 

नीता अंबानी यांनी MI च्या ताफ्यातून घडलेल्या अन् क्रिकेट जगतात गाजत असलेल्या जसप्रीत बुमराहच्या शोधाच्या आठवणीलाही उजाळा दिला. बुमराह मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात कसा आला त्यासंदर्भातील खास स्टोरीही नीता अंबानी यांनी शेअर केलीये. त्याची शैली अजबगजब होती. या गोलंदाजाचा शोध घेण्यात लसिथ मलिंगाची भूमिकाही मोलाची होती, असे त्यांनी म्हटले आहे. आता मुंबई इंडियन्सनं तिलक वर्माला लॉन्च केलंय, हे सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. 

 

टॅग्स :मुंबई इंडियन्सनीता अंबानीहार्दिक पांड्याक्रुणाल पांड्याजसप्रित बुमराहतिलक वर्मा