Join us

Harbhajan Singh Virat Kohli: "तुला लाज वाटेल..."; विराट कोहलीबद्दल बोलताना हरभजन सिंग असं का म्हणाला? रंगली चर्चा

Harbhajan Singh Virat Kohli: हरभजन सिंग विराट कोहलीसोबत अनेक क्रिकेट मालिका खेळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2024 13:03 IST

Open in App

Harbhajan Singh Virat Kohli: हरभजन सिंग हा भारताच्या महान फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून ते आयपीएलपर्यंत प्रत्येक ठिकाणी त्याने मैदान गाजवले. हरभजन संघात असताना विराट कोहलीने पदार्पण केले. विराटचा सुरुवातीचा काळ ते एक परिपूर्ण फलंदाज हा प्रवास भज्जीने स्वत: पाहिला. निवृत्तीनंतरही हरभजन क्रिकेटशी संबंधित असून समालोचक म्हणून भूमिका बजावतो आहे. अशातच त्याने विराटबद्दल केलेल्या एका विधानाने चर्चा रंगली आहे.

तुला लाज वाटेल...

"२०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी मालिकेदरम्यान कोहली खूपच अडचणीत होता. त्याच्या कसोटी क्रिकेटच्या सुरुवातीच्या टप्प्यात त्याला काहीच कळत नव्हते. सुरुवातीला आम्ही वेस्ट इंडिजमध्ये होतो. त्या दौऱ्यावर फिडेल एडवर्ड्सने त्याला खूप त्रास दिला. सतत एलबीडब्ल्यू किंवा शॉर्ट बॉल टाकून तो विराटची विकेट घेत होता. त्यामुळे साहजिकच तो खूप निराश झाला होता. त्याचा स्वतःवरचा विश्वास कमी होऊ लागला होता. त्याने मला प्रश्न विचारला की, 'मी पुरेसा चांगला खेळतो आहे का?' त्यावर मी त्याला म्हणालो, 'जर तू १०,००० धावा करू शकला नाहीस तर तुला स्वत:चीच लाज वाटेल. तुझ्याकडे कसोटी क्रिकेटमध्ये १०,००० धावा करण्याची क्षमता आहे. जर तू हा टप्पा गाठू शकला नाहीस तर ती तुझी स्वतःची चूक असेल. त्यानंतर कोहलीने ज्या खेळी केल्या, त्या दमदार होत्या," अशी आठवण हरभजनने सांगितली.

हरभजनने कथा सांगितली

हरभजनने २००८ मधील विराटच्या पहिल्या मालिकेचाही किस्सा सांगितला. कोहलीने डावाची सुरुवात करताना अर्धशतक ठोकले होते. पण तो त्याच्या खेळीवर खूश नव्हता. “मला एक प्रसंग आठवला. मला वाटते वीरू (वीरेंद्र सेहवाग) जखमी झाला होता. अजंता मेंडिस सगळ्यांना आऊट करत होता. त्यावेळी विराटने फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. ड्रेसिंग रुममध्ये आल्यावर त्याने मला विचारलं, 'पाजी, मी कसा खेळलो?' मी म्हणालो, 'खूप छान.' मग तो म्हणाला, 'पाजी, मी बाद पडायला नको होते. त्याने आणखी मारा करायला हवा होता. मला त्याची वृत्ती खूप आवडली.

टॅग्स :विराट कोहलीहरभजन सिंगभारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघविरेंद्र सेहवाग