Join us

Happy Birthday 'Saurav Ganguly', 46 वर्षांचा झाला टीम इंडियाचा 'दादा'

टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज 46 वा जन्मदिवस आहे. 8 जुलै 1972 साली कोलकात येथील एका गर्भश्रीमंत कुटुंबात सौरवचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम सौरवने केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 14:04 IST

Open in App

मुंबई - टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीचा आज 46 वा जन्मदिवस आहे. 8 जुलै 1972 साली कोलकात येथील एका गर्भश्रीमंत कुटुंबात सौरवचा जन्म झाला. भारतीय क्रिकेटला एका वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम सौरवने केले. सौरवने 424 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये 18575 धावा केल्या असून 132 गडी बाद करण्याची कामगिरी बजावली आहे. सन 2000 ते 2006 या कालावधीत सौरव भारतीय संघाचा स्टार कर्णधार होता. 

टीम इंडियाचा दादा सौरव गांगुली आज 46 वर्षांचा झाला. डाव्या हातात बॅट घेऊन सचिन तेंडुलकरच्या जोडीने मैदानात पाऊल ठेवणाऱ्या सौरवने भारतीय क्रिकेट चाहत्यांना अत्यानंद दिला. श्रीलंका, पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध सौरवने धडाकेबाज कामगिरी केली आहे. सन 2000 साली सचिन तेंडलकरने आपल्या आजारपणाचे कारण देत टीम इंडियाचे कर्णधारपद सोडले. त्यानंतर, सौरव गांगुलीकडे टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. सौरवने त्याच्या कारकिर्दीत 49 कसोटी आणि 146 सामन्यांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले. गांगुलीच्या कारकिर्दीत टीम इंडियाची कामगिरी दमदार राहिली. याचकाळात भारतीय संघाने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली. मात्र, विश्वचषकाने गांगुलीला हुलकावणी दिली. भारतीय क्रिकेटमधील योगदानाबद्दल गांगुलीला 2004 मध्ये पद्मश्री पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे. दरम्यान, टीम इंडियाचे प्रशिक्षक ग्रेग चॅपल यांच्यासोबतचा गांगुलीचा वाद चांगलाच चर्चेत आला होता. तर 2002 साली इंग्लंडमधील लॉर्ड मैदानावर गांगुलीने अंगातील टी-शर्ट काढून विजयाचे सेलिब्रेशन केले होते. गांगुलीचा हा विजयी जल्लोष जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. तर या प्रकारानंतर माध्यमांनी गांगुलीला टार्गेट केले. मात्र, चाहत्यांना गांगुलीची ही स्टाईल खूप आवडली होती. 

टॅग्स :सौरभ गांगुलीभारतीय क्रिकेट संघक्रिकेट