रोहित शर्मानं 2007मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सुरुवातीची 6 वर्ष ही रोहितसाठी चढउतारांची होती. माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीनं त्याला सलामीला बढती दिली अन् रोहितचं नशीब पालटलं... 2013मध्ये रोहितकडे इंडियन प्रीमिअर लीगमधील मुंबई इंडियन्स संघाची जबाबदारी आली. त्या वर्षी त्यानं मुंबई इंडियन्सला आयपीएल जेतेपद पटकावून दिले आणि त्याच वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावलं. रोहित आज त्याचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याला हिटमॅन हे नाव कुणी दिलं, हे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण जाणून घेणार आहोत.
मुंबई इंडियन्सने कर्णधार रोहितला हटके शुभेच्छा दिल्या. मुंबई इंडियन्सने काही दिवसांपूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला होता आणि त्यात रोहितची मुलाखत होती. त्यात रोहितनं त्याला हिटमॅन का बोलले जाते याचा खुलासा केला. 2013मध्ये जेव्हा रोहितनं द्विशतक झळकावलं तेव्हा स्टार स्पोट्स नेटवर्कच्या प्रोडक्शन सदस्यानं रोहितचा भारतीय क्रिकेटचा हिटमॅन असा उल्लेख केला. त्यानंतर हे नाव त्याच्यासोबत जोडले गेले.
रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सनं चार वेळा ( 2013, 2015, 2017 आणि 2019) आयपीएल जेतेपद पटकावले. आयपीएलची सर्वाधिक जेतेपद नावावर असलेला रोहित हा यशस्वी कर्णधार आहे.
फार कमी जणांना माहिती आहेत 'हिटमॅन' रोहित शर्माचे हे तीन विक्रम!
रोहित शर्माला बनायचं होतं गोलंदाज; आज जग त्याला 'हिटमॅन' म्हणून ओळखतं
रोहित शर्माचा फिल्मी अंदाज; गुडघ्यावर बसून रितिकाला केलेलं प्रपोज
त्यांचे चित्रपट पाहून लहानाचा मोठा झालो; Sachin Tendulkarनं वाहिली श्रद्धांजली