Gujarat Giants Vs Delhi Capitals Women's Premier League 2026 Eliminator Live Streaming : महिला प्रीमियर लीगच्या चौथ्या हंगामातील स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. अॅश्ले गार्डनरच्या नेतृत्वाखालील गुजरात जायंट्स विरुद्ध जेमिमा रॉड्रिग्सचा दिल्ली कॅपिटल्स संघ यांच्यात फायनलमध्ये एन्ट्री मारण्यासाठी एलिमिनेटर सामना खेळवला जाणार आहे. वडोदरा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगणाऱ्या सामन्यातील विजेता ५ फेब्रुवारीला होणाऱ्या अंतिम सामन्यात यंदाच्या हंगामातील टेबल टॉपर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) शी फायनलमध्ये खेळताना दिसेल. इथं एक नजर टाकुयात WPL मधील GG vs DC यांच्यातील Eliminator सामन्यातील Live Streaming संदर्भातील सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!दिल्ली कॅपिटल्सचा थरारक प्ले-ऑफ प्रवेश, गतविजेत्या MI चा पत्ता कट
दिल्ली कॅपिटल्सने साखळी फेरीतील आपल्या अखेरच्या सामन्यात UP वॉरियर्स विरुद्ध थरारक विजय नोंदवत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. या विजयासह त्यांनी गतविजेत्या मुंबई इंडियन्सला स्पर्धेबाहेर फेकले. या सामन्यात मरिझान कॅप हिने भेदक गोलंदाजी करत ३० धावा खर्च करत ३ विकेट्स घेतल्या होत्या. फलंदाजीत कर्णधार जेमिमा रोड्रिग्स हिने संयम दाखवत १८ चेंडूत ३४ धावांची बहुमूल्य खेळी साकारली होती.
बॉलिवूड-हॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर! WPLमध्ये जलवा बिखरणारी ही ग्लॅमर क्वीन कोण?
गुजरात जायंट्सची कमाल, गत चॅम्पियन MI ला पहिल्यांदाच पराभूत करत रचला इतिहासगुजरात जायंट्सने साखळी फेरीतील आपल्या शेवटच्या सामन्यात गतविजेत्या MI संघावर मात करत एलिमिनेटरमध्ये धडक मारली. WPL च्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी MI ला पराभूत करत नवा इतिहास रचला. अॅश्ले गार्डनर (४६) आणि जॉर्जिया वेअरहॅम (४४) या दोघींनी संघाला प्लेऑफ्समध्ये नेण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
WPL मध्ये गुजरात जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्ड
- एकूण सामने : ८
- गुजरात जायंट्स विजय : ४
- दिल्ली कॅपिटल्स विजय : ४
सामना कुठे रंगणार? तो कसा पाहता येईल?
गुजरात जाएंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील WPL एलिमिनेटर सामना वडोदराच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार, सायंकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी या सामन्याला सुरुवात होईल. टेलिव्हिजनवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामन्याचे थेट प्रेक्षपण करण्यात यणार असून जिओहॉटस्टार अॅप आणि वेबसाइटवर लाईव्ह स्ट्रिमिंगच्या माध्यमातून क्रिकेट चाहते या सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
Web Summary : Gujarat Giants and Delhi Capitals clash in the WPL Eliminator for a spot in the final against Royal Challengers Bangalore. Watch live on Star Sports and JioHotstar.
Web Summary : गुजरात जायंट्स और दिल्ली कैपिटल्स डब्ल्यूपीएल एलिमिनेटर में रॉयल चैलेंजर्स बैंगलोर के खिलाफ फाइनल में जगह के लिए भिड़ेंगे। स्टार स्पोर्ट्स और जियोहॉटस्टार पर लाइव देखें।