Join us

WPL Auction Live : १० लाख ते २ कोटी! भारताची २० वर्षीय काशवी गौतम गुजरात जायंट्सच्या ताफ्यात

WPL Auction Live : आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 16:54 IST

Open in App

wpl auction live updates in marathi  । मुंबई : भारताची अनकॅप्ड खेळाडू काशवी गौतमवर बरीच बोली लागली. तिला खरेदी करण्यासाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात लढत झाली. यानंतर आरसीबीने अखेर माघार घेतली अन् काशवी गुजरातच्या ताफ्यात गेली. आरसीबीने माघार घेतल्यानंतर यूपी वॉरियर्सने बोली लावायला सुरुवात केली होती. यूपी आणि गुजरातमध्ये जोरदार लढत झाली. तिची मूळ किंमत १० लाख रुपये होती आणि तिला गुजरात जायंट्सने २ कोटी रुपयांना विकत घेतले.

आज मुंबईत महिला प्रीमिअर लीगच्या दुसऱ्या हंगामासाठी लिलाव पार पडत आहे. यावेळी एकूण १६५ खेळाडूंनी WPL २०२४ च्या लिलावासाठी नोंदणी केली. यामध्ये १०४ भारतीय आणि ६१ परदेशी खेळाडू आहेत. १६५ क्रिकेटपटूंपैकी १५ खेळाडू सहयोगी देशांचे आहेत, तर कॅप्ड खेळाडूंची एकूण संख्या ५६ आणि अनकॅप्ड खेळाडू १०९ आहेत. पाच संघांकडे जास्तीत जास्त ३० स्लॉट उपलब्ध आहेत, त्यापैकी ९ जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत. खरं तर यंदाच्या लिलावात काही नामांकित खेळाडू अनसोल्ड राहिले तर नवख्या खेळाडूंनी कोट्यवधीपर्यंत मजल मारली. त्यातीलच एक म्हणजे भारताची काशवी गौतम. 

दरम्यान, काशवी गौतम यंदाच्या लिलावातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरपेक्षा अधिक बोली काशवीवर लागली आहे. मागील हंगामाच्या लिलावात शेफाली वर्माला २ कोटी मिळाले होती, ज्याची बरोबरी २० वर्षीय काशवी गौतमने केली. 

 

 

 

 

टॅग्स :महिला प्रीमिअर लीगभारतीय क्रिकेट संघ