भारतीय संघाचा यष्टिरक्षक दिनेश कार्तिक ( Dinesh Karthik) सध्या लंडनमध्ये समालोचकाच्या भूमिकेत दिसत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत त्याच्या समालोचनानं सर्वांना प्रभावित केलं. सामन्यातील अनेक बारकावे अगदी सहजतेनं तो चाहत्यांना समजावून सांगत होता. त्यानंतर तो इंग्लंड-श्रीलंका यांच्यातल्या मर्यादित षटकांच्या सामन्यातही समालोचन करताना दिसला. इंग्लंड-श्रीलंका यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात कार्तिकनं केलेलं एक विधान चर्चेचं विषय बनलं होतं. ‘बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखीच असते. दुसऱ्याची बॅट इतर खेळाडूंना अधिक आवडते,’ असे वक्तव्य त्यानं केलं होतं.
रवी शास्त्रींचा कार्यकाळ ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर संपणार; राहुल द्रविडचं नाव चर्चेत, कपिल देव यांचं मोठं विधान
त्याच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मुरली विजय व कार्तिकची पहिली पत्नी यांची चर्चा सुरू झाली. दिनेश व मुरली हे चांगले मित्र होते, पण मुरलीनं दिनेशची पहिली पत्नी निकिता हिच्यासोबत लग्न केलं अन् ही मैत्री तुटली. आता दिनेशच्या या विधानानंतर नेटकऱ्यांनी मुरली विजयला ट्रोल केले.
IPL 2022 Mega Auction : सुरेश रैनाला वगळून ऋतुराजला पसंती; जाणून घ्या रिटेशन नियमानुसार प्रत्येक फ्रँचायझी कोणाला ठेवणार कायम!
काय म्हणाला होता कार्तिक?
‘अनेक फलंदाजांना स्वत:ची बॅट पसंत नसते. त्यांना फलंदाजीसाठी दुसऱ्याची बॅट हवी असते. बॅट ही शेजाऱ्याच्या पत्नीसारखी आहे. इतरांना ती खूप आवडते,’ असे कार्तिकने उच्चारताच सहकारी समालोचकही हसले. कार्तिकच्या या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. बॅटबद्दल त्याने गमतीशीर वक्तव्य करताच अनेकांना हसू आवरणे कठीण झाले होते.
तिसऱ्या वन डे दरम्यान कार्तिकची माफी''मागील सामन्यात केलेल्या विधानाबद्दल मी माफी मागतो. मला तसं म्हणायचं नव्हतं, परंतु त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला. मी सर्वांची माफी मागतो. त्या वक्तव्यानंतर मला पत्नी व आईकडून रट्टे मिळाले. माझ्याकडून असे पुन्हा घडणार नाही,''असे कार्तिक म्हणाला.