Join us  

क्रिकेटप्रेमींना आयसीसी देणार गिफ्ट; 2023- 2031मध्ये करणार मोठ्या स्पर्धांचे आयोजन

आयसीसीच्या योजनेनुसार ट्वेंटी- 20 चॅम्पियन्स कप 2024 आणि 2028 मध्ये होणार असून वन- डे चॅम्पियन्स कप 2025 आणि 2029 मध्ये आयोजित करण्याचा आयसीसीचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 10:12 AM

Open in App

क्रिकेटच्या खेळात बदलत्या काळानुसार अनेक नवे बदल होत आहेत. त्यातच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आगामी काळात जागतिक स्तरावर नव्या स्पर्धांचे आयोजन करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र आयसीसीकडून याबाबात अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

2023 ते 2031 या कालावधीत चॅम्पियन्स कपची सुरु करण्याची घोषणा आयसीसीकडून केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. चॅम्पियन कप ट्वेंटी- 20 आणि एकदिवसीय प्रकारात खेळला जाईल. यामध्ये ट्वेंटी- 20 साठी आयसीसी रँकिंगमधील प्रथम दहा संघाचा आणि एकदिवसीय स्पर्धेसाठी प्रथम सहा संघांचा सामना होईल.

आयसीसीच्या योजनेनुसार ट्वेंटी- 20 चॅम्पियन्स कप 2024 आणि 2028 मध्ये होणार असून वन- डे चॅम्पियन्स कप 2025 आणि 2029 मध्ये आयोजित करण्याचा आयसीसीचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच सध्या सुरु असलेल्या दोन विश्वकप स्पर्धा देखील होणार आहे. आयसीसीद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या नव्या स्पर्धांशिवाय ट्वेंटी- 20 विश्वकप 2026 मध्ये तर दुसरा विश्वकप 2030 मध्ये होईल. तर वन- डे विश्वकप 2027 आणि 2031 मध्ये खेळवला जाईल. त्यामुळे क्रिकेटप्रेमींनना दरवर्षी आयसीसीची मोठी स्पर्धा बघायला मिळणार आहे.

टॅग्स :आयसीसीभारतआॅस्ट्रेलियापाकिस्तानद. आफ्रिकाबीसीसीआयन्यूझीलंडवेस्ट इंडिज