गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...

Gautam Gambhir Mother News: भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:31 IST2025-06-13T15:30:26+5:302025-06-13T15:31:33+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
Gautam Gambhir's mother suffers heart attack; he returns to India after England series | गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...

गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...

Gautam Gambhir's Mother Heart Attack: शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ इंग्लंड विरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी लंडनमध्ये पोहचला असून, संघाने सरावही सुरू केला आहे. पण, दरम्यान संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्यामुळे तो तातडीने भारतात परतला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गौतम गंभीर ७ जून रोजी संघासह लंडनला पोहोचला. संघ सध्या बेकेनहॅममध्ये सराव करत आहे. आजपासून अंतर्गत सराव सामना खेळला जाणार होता, परंतु त्यापूर्वी गौतम गंभीरला भारतात परतावे लागले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे गौतम गंभीरची आई सीमा यांना आयसीयूत दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने त्या धोक्याबाहेर आहेत. त्यामुळे गंभीर २० जूनपासून सुरू होणाऱ्या कसोटीपूर्वी इंग्लंडमध्ये संघासोबत परतण्याची अपेक्षा आहे.

भारतासाठी इंगड्लमध्ये विजयाचा दुष्काळ 
भारतीय क्रिकेट संघाने १८ वर्षांपासून इंग्लंडमध्ये कोणतीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. या काळात एमएस धोनी आणि विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली संघाने इंग्लंडमध्ये २-२ कसोटी मालिका खेळल्या, त्यापैकी ३ मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला, तर १ अनिर्णित राहिली. आता शुबमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ कशी कामगिरी करतो, हे पाहणे महत्वाचे आहे.

Web Title: Gautam Gambhir's mother suffers heart attack; he returns to India after England series