गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'

Gautam Gambhir Team India Head Coach BCCI Plan, IND vs SA Test: तब्बल १२ वर्षांनी टीम इंडियाला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 12:23 IST2025-11-27T12:22:52+5:302025-11-27T12:23:32+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
gautam gambhir will not be removed from team india head coach post BCCI has new plan after the embarrassing defeat in ind vs sa 2nd test | गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'

गौतम गंभीरची कोच पदावरून हकालपट्टी होणार? लाजिरवाण्या पराभवानंतर BCCIने आखला नवीन 'प्लॅन'

Gautam Gambhir Team India Head Coach BCCI Plan, IND vs SA Test: घरच्या मैदानावर जवळपास १२ वर्षांपासून एकही कसोटी मालिका न गमावलेल्या टीम इंडियावर गेल्या १२ महिन्यांत दुसऱ्यांदा पराभवाची नामुष्की ओढवली. भारतीय संघाचा कसोटी इतिहासातील सर्वात मोठा आणि वाईट पराभव झाला. २०१२ ते २०२४ दरम्यान घरच्या मैदानावर जेमतेम पाच ते सहा सामने गमावणाऱ्या टीम इंडियाने आता २०२४ मध्ये न्यूझीलंड मालिका आणि दक्षिण आफ्रिका मालिका यांच्यातील सातपैकी पाच सामने गमावले आहेत. हे सर्व सध्याचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कार्यकाळात घडले आहे. परिणामी, गंभीरच्या प्रशिक्षकपदाच्या भविष्याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होणे साहजिक आहे. केवळ गंभीरच नाही तर मुख्य निवडकर्ता अजित आगरकर देखील टीकेचा धनी होताना दिसत आहेत. याचदरम्यान, भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (BCCI) कडून एक महत्त्वाची अपडेट येताना दिसत आहे.

गंभीरसाठी BCCIचा प्लॅन काय?

इंडियन एक्सप्रेसमधील एका वृत्तानुसार, एकाच वर्षात दोन कसोटी मालिका हरण्याची नामुष्की सहन करावी लागल्यानंतरही, BCCI सध्या घाईघाईने कारवाई करण्याची कुठलीही योजना आखत नाहीये. BCCIच्या सूत्रांचा हवाला देत या अहवालात म्हटले आहे की, संघ सध्या विविध बदलांतून जात आहे. काही अनुभवी खेळाडू निवृत्त झाले आहेत. काही खेळाडू दुखापतीतून सावरत आहे. या टप्प्यात बोर्ड घाईघाईने कारवाई करण्यास तयार नाही. तसेच असा दावाही करण्यात आला आहे की, सध्या खेळाडूंमध्येही कोणतेही बदल करण्याचा बोर्डाचा विचार नाही.

गंभीरचा करार विश्वचषकापर्यंत

गौतम गंभीर पद सोडणार? अशी सध्या चर्चा सुरू आहे. बोर्डाच्या सूत्राचा हवाला देत या अहवालात वेगळेच संकेत मिळत आहेत. "आम्ही सध्या गंभीरबद्दल कोणताही निर्णय घेणार नाही. कारण विश्वचषक अगदी जवळ आला आहे आणि त्याचा करार २०२७ पर्यंत चालेल," असे BCCI चे मत आहे. गंभीरला जुलै २०२४ मध्ये टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आणि त्याला तीन वर्षांचा कार्यकाळ देण्यात आला, जो २०२७च्या विश्वचषकापर्यंत राहील. या पराभवानंतर बीसीसीआयचे अधिकारी निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाशी बोलणार आहेत आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करतील असेही सांगितले जात आहे.

टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका कधी?

१२ महिन्यांत घरच्या मैदानावर पाच कसोटी सामने गमावले असले तरी, प्रशिक्षक गौतम गंभीर यांचे स्थान सध्या धोक्यात नाही, असे म्हटले जात आहे. टीम इंडियाची पुढील कसोटी मालिका ऑगस्ट २०२६ मध्ये होणार आहे. भारत तेव्हा श्रीलंकेचा दौरा करेल. तसेच, भारताची पुढील घरच्या मैदानावरची कसोटी मालिका थेट २०२७ मध्ये होणार आहे, जेव्हा पुन्हा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया भारताचा दौरा येईल. त्यामुळे, गंभीरकडे या फॉरमॅटसाठी रणनीती आखण्यासाठी भरपूर वेळ आहे.

Web Title : टेस्ट सीरीज हार के बाद गौतम गंभीर का कोचिंग भविष्य अनिश्चित?

Web Summary : भारत की टेस्ट सीरीज हार के बाद कोच गौतम गंभीर के भविष्य पर सवाल उठ रहे हैं। नुकसान के बावजूद, बीसीसीआई बदलावों में जल्दबाजी नहीं कर रहा है, खिलाड़ी परिवर्तन और 2027 विश्व कप तक अनुबंध का हवाला दे रहा है। भविष्य की योजनाओं पर चर्चा की जाएगी।

Web Title : Gautam Gambhir's coaching future uncertain after India's test series loss?

Web Summary : After India's test series defeat, questions arise about coach Gautam Gambhir's future. Despite losses, BCCI isn't rushing changes, citing player transitions and a contract until the 2027 World Cup. Future plans will be discussed.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.