Join us
Daily Top 2Weekly Top 5

"कदाचित मी चुकलो असेन; पण..." रोहित-विराटसंदर्भात रंगलेल्या चर्चेवर कोच गौतम गंभीरचं सूचक वक्तव्य

ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गंभीर आणि रोहित-कोहली यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:26 IST

Open in App

भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यासोबतच्या मतभेदाच्या चर्चेवर सूचक व्यक्तव्य केले आहे. मी माणूस आहे, माझ्याकडूनही चुका होऊ शकतात, असे म्हणत त्याने रोहित आणि विराट कोहली या स्टार खेळाडूंना हाताळण्यात कमी पडल्याचे मान्य केल्याचे दिसते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर गंभीर आणि रोहित-कोहली यांच्यात मतभेद झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

गतवर्षी  भारतीय क्रिकेट वर्तुळात हिटमॅन रोहित पाठोपाठ विराट कोहलीनं कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. या दोघांनी गंभीरच्या दबावातून हा निर्णय घेतल्याची चर्चा रंगली होती. यावर पहिल्यांदाच गंभीर यांनी कदाचित चुका झाल्या असतील, असे बोलून दाखवले आहे.

"पाकिस्तानी खेळाडूला पैसा देत असेल तर ती.." गावसकरांनी IPL चा दाखला देत काव्या मारनला सुनावलं

गंभीरला बाउन्सर

रेवस्पोर्ट्स ट्रेलब्लेझर्स कॉन्क्लेव्हमध्ये गौतम गंभीर याला सोशल मीडियावरील ट्रोलिंग, बाहेरील आवाज आणि वरिष्ठ खेळाडूंशी मतभेदांच्या चर्चांमुळे दबाव येतो का? भारतीय संघ एकाच ड्रेसिंग रूममध्ये खेळ जिंकत असताना मुख्य प्रशिक्षक विरुद्ध वरिष्ठ खेळाडू अशा चर्चा कशा हाताळता? असा प्रश्न विचारण्यात आला होता.  

टीम इंडियाच्या कोचनं असं दिलं उत्तर

यावर गंभीर म्हणाला की, "मी माणूस आहे आणि इतरांप्रमाणे मला देखील चुका करण्याची मुभा असावी. खेळाडूंनाही चुका करण्याची परवानगी असते. गेल्या १८ महिन्यांत माझ्याकडूनही चुका झाल्या असतील. मी कधीच त्यापासून पळ काढलेला नाही. पण माझा नेहमी एक विश्वास राहिला आहे, योग्य हेतूने घेतलेला चुकीचा निर्णय मान्य असतो, पण चुकीच्या हेतूने घेतलेला निर्णय अजिबात स्वीकारार्ह नसतो. प्रत्येकाला चुका करण्याची संधी असावी."

प्रामाणिकपणाला सर्वाधिक महत्त्व

गंभीर याने स्पष्ट केले की, त्यांच्या दृष्टीने प्रामाणिकपणा सर्वात महत्त्वाचा आहे. "जोपर्यंत मी माझे काम पूर्ण प्रामाणिकपणे करतो आणि ड्रेसिंग रूममधील प्रत्येकाशी प्रामाणिक राहतो, तोपर्यंत मला वाटते की, मी माझ्या पदाशी न्याय करत आहे." या वक्तव्यामुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण आणि प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंच्यातील मतभेदाची गोष्टी  पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gautam Gambhir hints at errors handling Rohit, Virat amid rift rumors.

Web Summary : Gautam Gambhir acknowledged potential errors in handling Rohit Sharma and Virat Kohli, amidst rumors of disagreements following the Australia tour. He emphasized honesty and admitted mistakes could have occurred during his tenure. The coach's statement revives discussions about dressing room dynamics.
टॅग्स :भारतीय क्रिकेट संघरोहित शर्माविराट कोहलीगौतम गंभीरबीसीसीआय