Gautam Gambhir Hosts Special Dinner For T20 World Cup Team : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने रविवारी, आपल्या अलिशान निवासस्थानी टीम इंडियासाठी खास डिनर पार्टीचे आयोजन केले होते. भारतीय संघ १२ फेब्रुवारी रोजी नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या नामीबियाविरुद्धच्या लढतीसाठी दिल्लीत पोहचला आहे. ICC टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील या दुसऱ्या सामन्याआधी कोचनं संघातील सर्व खेळाडू आणि स्टाफ सदस्यांना डिनर पार्टीचा बेत आखला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्लाही पार्टीला उपस्थित होते.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
"जल्दी खा लियो…" कोच गंभीरनं स्फोटक बॅटरला असं का म्हणाला?
या पार्टीदरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत भारतीय संघाचा फलंदाज अभिषेक शर्मा हा अन्य खेळाडूंप्रमाणे गंभीर आणि त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन डिनर पार्टीत पोहचल्याचे दिसते. यावेळी गंभीरने युवा बॅटरला हाक मारत,... "लवकर जेवण कर अन् नीघ" असे म्हटले. मग अभिषेक शर्मानंही सगळ्यात आधी डिनर पार्टीतून बाहेर पडल्याचे पाहायला मिळाले. पण डिनर पार्टीत असं का घडलं? असा प्रश्नही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. जाणून घेऊयात त्यासंदर्भातील सविस्तर
Ind vs Pak सामन्यावरून तणाव वाढत असताना टीम इंडियाने अचानक घेतला मोठा निर्णय
..अन् सर्वांत आधी गंभीरच्या घराबाहेर पडला अभिषेक शर्मा
वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यानही भारतीय संघासाठी कोचच्या घरी पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील दिल्लीच्या मैदानातील सामन्याआधीही भारतीय संघातील सदस्यांनी पुन्हा एकदा गौतम गंभीरच्या घरी डिनर पार्टीचा अस्वाद घेतला. अभिषेक शर्मा हा सर्वांच्या आधी या डिनर पार्टीतून बाहेर पडला. त्याची तब्येत ठीक नसल्याची गोष्ट सूर्यकुमार यादवनं पहिल्या सामन्यानंतर शेअर केली होती. USA विरुद्धच्या सामन्यात तो फिल्डिंगसाठीही आला नव्हता. हीच गोष्ट लक्षात घेऊन काळजीपोटी गौतम गंभीरनं त्याला लवकर जेवण करून विश्रांतीचा सल्ला दिल्याचे दिसते.
अभिषेक शर्माचा धमाका दिसणार का?
USA विरुद्धच्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. या 'गोल्डन डक'सह टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद होणाऱ्या गौतम गंभीरच्या नकोशा विक्रमाशी त्याने बरोबरी केली. दिल्लीच्या मैदानात तो मैदानात ही कसर भरून काढेल, असे दिसते.