Virat Kohli Video: मॅच फिनिश करण्यापासून ते फिल्डिंगपर्यंत...! आयसीसीने किंग कोहलीला ठोकला 'सलाम'

भारतीय संघाचा स्टार विराट कोहली ट्वेंटी-20 विश्वचषकात शानदार लयमध्ये पाहायला मिळाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 05:29 PM2022-12-06T17:29:52+5:302022-12-06T17:30:44+5:30

whatsapp join usJoin us
From finishing the match to fielding, the ICC has shared a video of Virat Kohli's performance and praised him | Virat Kohli Video: मॅच फिनिश करण्यापासून ते फिल्डिंगपर्यंत...! आयसीसीने किंग कोहलीला ठोकला 'सलाम'

Virat Kohli Video: मॅच फिनिश करण्यापासून ते फिल्डिंगपर्यंत...! आयसीसीने किंग कोहलीला ठोकला 'सलाम'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली : भारतीय संघाचा स्टार विराट कोहली ट्वेंटी-20 विश्वचषकात शानदार लयमध्ये पाहायला मिळाला. नोव्हेंबर 2019 मध्ये आपले शेवटचे कसोटी शतक झळकावणाऱ्या विराटला जवळपास तीन वर्षे शतक झळकावता आले नव्हते. परंतु त्याने आशिया चषकामध्ये अफगाणिस्तानविरुद्ध शतक झळकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 71वे शतक पूर्ण केले. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि मागील दोन वर्षांत करू शकला नाही अशी किमया साधली. 

विराट कोहलीने ट्वेंटी-20 विश्वचषकात भारताच्या सलामीच्या सामन्यातच शानदार खेळी केली. त्याने नाबाद 82 धावांची खेळी करून कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभवाची धूळ चारली. या सामन्यात भारताचे लवकर 4 गडी बाद झाले होते. यानंतर विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांनी शतकी भागीदारी नोंदवून भारताचे सामन्यात पुनरागमन केले. 19व्या षटकातील अखेरच्या 2 चेंडूवर विराटने हॅरिस रौफला षटकार ठोकून विजयाकडे कूच केली. यातील एक षटकार क्रिकेट वर्तुळाचा अविस्मरणीय क्षण बनला आहे.

याशिवाय विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना कोहलीने अप्रतिम झेल घेतला. तीस यार्ड वर्तुळात क्षेत्ररक्षण करतानाही त्याने उत्कृष्ट धावबाद केले. फलंदाजाच्या अगदी जवळ उभे राहूनही उत्कृष्ट झेल घेतला. 

ICCने किंग कोहलीला ठोकला 'सलाम'
किंग कोहली यंदाच्या ट्वेंटी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने तिसऱ्यांदा ट्वेंटी-20 विश्वचषकात सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळवला. त्याने ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा मान देखील पटकावला. मागील जानेवारी महिन्यात विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यामुळे वर्षाची सुरुवात निराशाजनक झाली होती, परंतु त्यानंतर कोहलीने उल्लेखनीय पुनरागमन करून वर्षाचा शेवट शानदार पद्धतीने केला. आयसीसीने विराटचा एक व्हिडीओ शेअर करत लिहले, "विराटने 2022 मध्ये काय खास केले आहे, जे त्याचे चाहते कधीही विसरणार नाहीत." 

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: From finishing the match to fielding, the ICC has shared a video of Virat Kohli's performance and praised him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.