Join us  

IPL 2020 पूर्वी किरॉन पोलार्डचा दमदार फॉर्म; CPL Finalमध्ये डॅरेन सॅमीच्या संघाचा काढला घाम

CPL2020Final : सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला यश मिऴवून दिले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 9:46 PM

Open in App

इंडियन प्रीमिअर लीगला ( Indian Premier League) सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्सच्या ( Mumbai Indians) ताफ्यात आनंदाचे वातावरण आहे. मुंबई इंडियन्सचा ( MI) हुकमी एक्का किरॉन पोलार्डनं (Kieron Pollard) कॅरेबियन प्रीमिअर लीगमध्ये ( CPL 2020) दमदार कामगिरीचे प्रदर्शन दिलं. त्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या त्रिनबागो नाइट रायडर्सनं ( Trinbago Knight Riders) CPL 2020 सलग 11 सामने जिंकून ऐटीत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीतही रायडर्सची धडाकेबाज कामगिरी कायम राहिलेली पाहायला मिळाली. कर्णधार पोलार्डनं अंतिम सामन्यात डॅरेन सॅमीच्या सेंट ल्युसीआ झौक्स ( St Lucia Zouks) संघाच्या फलंदाजांना घाम फोडला. त्याच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांना मोठी खेळी साकारता आली नाही.

सुनील नरीनच्या अनुपस्थितीत रायडर्सचा कस लागेल असे वाटले होते, परंतु पोलार्डनं आपल्या अऩुभवाच्या जोरावर संघाला विजयाच्या दिशेने कूच करून दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या झौक्सच्या सलामीवीर रहकीम कोर्नवॉल ( 8) दुसऱ्याच षटकात अली खानच्या यॉर्करसमोर त्रिफळाचीत झाला.  त्यानंतर मार्क डेयाल व आंद्रे फ्लेचर यांनी झौक्सचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी करून झौक्सला ट्रॅकवर आणले. पण, फवाद अहमदनं 9व्या षटकात डेयालला ( 29) बाद केले. त्यानंतर पोलार्डच्या भेदक माऱ्यासमोर झौक्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. फ्लेचर 39, रोस्टन चेस 22  आणि नजीबुल्लाह झाद्रान 24 धावांवर बाद झाले. या तिघांनाही पोलार्डनं बाद केले. त्यानंतर झौक्सची गाडी घसरली ती रुळावर आलीच नाही. त्यांचा संपूर्ण संघ 19.1 षटकांत 154 धावांत माघारी परतला. पोलार्डनं 30 धावांत 4 विकेट्स घेतल्या. अली खान व फवाद यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

टॅग्स :कॅरेबियन प्रीमिअर लीगटी-20 क्रिकेटमुंबई इंडियन्स