Former umpire Rudi Koertzen passed away : सर्वात लोकप्रिय अम्पायर्सपैकी एक असलेले दक्षिण आफ्रिकेचे रुडी कर्टझन आणि अन्य तीन जणांचा कार अपघातात निधन झाले. Riversdale येथे हा अपघात झाल्याची माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे. ७३ वर्षीय कर्टझन हे नेल्सन मंडेला बे येथील डेस्पॅच येथे राहणारे होते आणि गोल्फ खेळून ते केप टाऊन येथे घराच्या दिशेने निघाले होते. त्यांचा मुलगा रुडी कर्टझन ज्युनिया याने Algoa FM News ला वडिलांच्या निधनाची बातमी दिली. ''ते त्यांच्या मित्रांसोबत गोल्फ स्पर्धा पूर्ण करून घराच्या दिशेने निघाले होते आणि सोमवारी ते घरी येणे अपेक्षित होते, परंतु ते आणखी एक राऊंड खेळण्यासाठी थांबले होते,''असे कर्टझन ज्युनियरने सांगितले.
कर्टझन यांनी ३३१ आंतरराष्ट्रीय सामन्यांत पंचगिरी केली आहे. २६ मार्च १९४९ मधील त्यांचा जन्म. त्यांनी दक्षिण आफ्रिकन रेल्वे संघाकडून क्रिकेट सामने खेळले होते, परंतु १९८१मध्ये त्यांनी अम्पायर बनण्याचा निर्णय घेतला. ९ डिसेंबर १९९२ मध्ये त्यांनी पहिल्या वन डे सामन्यात अम्पायरिंग केली आणि त्याच महिन्यात त्यांनी कसोटी सामन्यातही पंचगिरी केली. भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली ती मॅच होती. याच सामन्यात टेलिव्हिजन रिप्लेची सुरुवात झाली होती.
१९९७मध्ये ते
आयसीसीच्या अम्पायर पॅनलचे पूर्णवेळ सदस्य झाले आणि २००२मध्ये त्यांनी एलिट पॅनलमध्ये स्थान पटकावले. त्यांनी २०९ वन डे सामन्यात व १०८ कसोटी सामन्यांत पंचगिरी केली. १९९९ मध्ये त्यांनी भारत-वेस्ट इंडिज यांच्यातली कोका कोला सिंगापोर चॅलेंज स्पर्धेची अंतिम लढत फिक्स करण्यासाठी मिळणारी लाच नाकारली होती. २००५ व २००६ मध्ये त्यांना
आयसीसी अम्पायर ऑफ दी इयरने गौरविण्यात आले. २०१०मध्ये त्यांनी निवृत्ती जाहीर केली.