"आम्ही भारताविरूद्ध नेहमी हरायचो पण आता...", वकार युनूसचा टीम इंडियाला इशारा

India vs Pakistan Asia Cup 2023 : ३० ऑगस्टपासून आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2023 07:32 PM2023-08-05T19:32:15+5:302023-08-05T19:32:38+5:30

whatsapp join usJoin us
Former player waqar younis has said that Pakistan team can beat India in Asia Cup 2023  | "आम्ही भारताविरूद्ध नेहमी हरायचो पण आता...", वकार युनूसचा टीम इंडियाला इशारा

"आम्ही भारताविरूद्ध नेहमी हरायचो पण आता...", वकार युनूसचा टीम इंडियाला इशारा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेटच्या मैदानात कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान आमनेसामने येणार म्हटलं की क्रिकेट वर्तुळात एकच चर्चा रंगत असते. आता मोठ्या कालावधीनंतर पुन्हा एकदा हे प्रतिस्पर्धी भिडणार आहेत. त्यामुळे या सामन्यासाठी दोन्हीही देशातील चाहते आतुर आहेत. आशिया चषकात २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. ३० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या बहुराष्ट्रीय स्पर्धेत भारताचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. या स्पर्धेला आता एक महिन्याहून कमी कालावाधी उरला आहे. अशातच पाकिस्तानचा माजी खेळाडू वकार युनूसने टीम इंडियाला इशारा दिला आहे.

पाकिस्तानी संघात आता बदल झाला असून पहिल्या संघाच्या तुलनेत विद्यमान संघ अधिक मजबूत असल्याचे युनूसने म्हटले आहे. क्रिकेट पाकिस्तानशी बोलताना त्याने म्हटले, "२०२१ च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून पराभव करत टीम इंडियाचा आमच्याविरूद्धचा विजयरथ रोखला. यावेळीही पाकिस्तानचा संघ भारताला हरवू शकतो. कारण भारतीय संघापेक्षा आमच्या संघात अधिक मॅचविनर्स आहेत." 

"तरीही विश्वचषकात भारताविरुद्ध हरायचो"
तसेच आमच्या काळात आत्ताच्या तुलनेत दबाव हा मोठा चिंतेचा विषय नव्हता. ज्या संघाविरूद्ध तुम्ही कमी खेळता तितका दबाव वाढत असतो. खासकरून जर भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना असेल तर दबाव तिप्पट असतो. कदाचित आमच्या काळात ते तुलनेने कमी होते कारण आम्ही आमच्या सुरुवातीच्या काळात एकमेकांविरूद्ध भरपूर क्रिकेट खेळायचो. पण, तरीही विश्वचषकात भारताविरुद्ध हरायचो. पण, आजकाल खेळाडू नक्कीच दबाव अधिक चांगल्या प्रकारे हाताळत आहेत, असेही त्याने सांगितले. 

...तर भारताचा पराभव निश्चित - युनूस
वकास युनूसने आणखी सांगितले की, पाकिस्तानी संघात अनेक मॅच विनर खेळाडू आहेत. बाबर आझम, शाहीन आफ्रिदी आणि सलामीवीर फखर झमान हे स्वबळावर सामना जिंकवू शकतात. तसेच त्यांचा भारतासोबत चांगला रेकॉर्ड आहे. शाहीन-फखर चमत्कार करू शकतात. इमामलाही आपण शानदार खेळी करताना पाहिले आहे. फक्त दबाव हाताळण्यात त्यांना यश आले तर ते नक्कीच भारताचा पराभव करतील. 

आशिया चषकाचे वेळापत्रक खालीलप्रमाणे - 
३० ऑगस्ट - पाकिस्तान विरूद्ध नेपाळ, मुल्तान
३१ ऑगस्ट - बांगलादेश विरूद्ध श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान विरूद्ध भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत विरूद्ध नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका विरूद्ध अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल

Web Title: Former player waqar younis has said that Pakistan team can beat India in Asia Cup 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.