मुंबई इंडियन्सचा माजी ओपनर आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ख्रिस लिग ( Chris Lynn) हा इंडियन प्रीमिअर लीग २०२२ ( IPL 2022) मध्ये समालोचन करताना दिसला. पण, आता तो पुन्हा मैदानावर परतला आहे आणि ट्वेंटी-२० ब्लास्ट स्पर्धेत नॉर्थम्प्टनशायर ( Northamptonshire) संघाचे प्रतिनिधित्व करतोय. या स्पर्धेतील दुसऱ्याच लढतीत ख्रिस लीनचं वादळ घोंगावलंय आणइ त्याने डरहॅमविरुद्ध ४६ चेंडूंत ८३ धावांची वादळी खेळी केली. लिनने बेन कुरन याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी करताना संघाला २२३ धावांचा पल्ला गाठून दिला. त्याच्या या स्फोटक खेळीत ४ चौकार व ८ षटकारांचा समावेश आहे. या षटकारांपैकी मारलेला एक षटकात सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय...
ख्रिस लिनने मारलेला एक षटकात थेट मैदानाबाहेरील घराच्या अंगणात जाऊन पडला. त्या घराच्या मालकांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केला.
लिन व्यतिरिक्त सलामीवीर रॉब कॉफ याने २१ चेंडूंत ३६ धावा केल्या. डरहॅमला ३१ धावांनी हा सामना गमवावा लागला.