रोहित शर्माने CSK कडून खेळावे...! मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची इच्छा, म्हणाला...

MI फ्रँचायझीच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले आणि चर्चा अशीही आहे की रोहितही नाराज आहे. त्याची पत्नी रितिका सजदेह हिने अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावरून तशी नाराजी प्रकट केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 11:51 AM2024-03-11T11:51:45+5:302024-03-11T11:53:08+5:30

whatsapp join usJoin us
Former Mumbai Indians and Chennai Super Kings player Ambati Rayudu wants Rohit Sharma to play for CSK in the Indian Premier League 2025 | रोहित शर्माने CSK कडून खेळावे...! मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची इच्छा, म्हणाला...

रोहित शर्माने CSK कडून खेळावे...! मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूची इच्छा, म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Indian Premier League 2024 : इंडियन प्रीमिअर लीग २०२४ सुरू होण्यास अवघे ११ दिवस शिल्लक राहिले आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या लढतीने २२ मार्चपासून आयपीएल २०२४ सुरू होणार आहे. पण, हे पर्व सुरू होण्यापूर्वी बऱ्याच घडामोडी घडल्या, ज्या चाहत्यांना पचवणे अजूनही अवघड जात आहे. त्यापैकी एक अन् महत्त्वाची घडामोड म्हणजे रोहित शर्माकडूनमुंबई इंडियन्सने कर्णधारपद काढून घेऊन हार्दिक पांड्याकडे सोपवलं... गुजरात टायटन्सला दोनवेळा फायनलमध्ये घेऊन जाणाऱ्या हार्दिकची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाली आहे. 


MI फ्रँचायझीच्या या निर्णयावर चाहते नाराज झाले आणि चर्चा अशीही आहे की रोहितही नाराज आहे. त्याची पत्नी रितिका सजदेह हिने अप्रत्यक्षपणे सोशल मीडियावरून तशी नाराजी प्रकट केली होती. आता रोहित आयपीएल २०२४ मध्ये हार्दिकच्या नेतृत्वाखाली खेळतो का, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईने पाच आयपीएल जेतेपद पटकावली आहेत. आयपीएल २०२५ साठी मेगा ऑक्शन होणार असल्याचे कालच चेअरमन धुमाळ यांनी जाहीर केले होते. त्यामुळे रोहितने आयपीएल २०२५ मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावे, अशी इच्छा CSK व MIचा माजी खेळाडू अंबाती रायुडू याने व्यक्त केली आहे.


मुंबई संघाचा अविभाज्य भाग असलेला रायुडू फ्रँचायझीच्या निर्णयाने अस्वस्थ दिसला आणि अनुभवी रोहित शर्माने चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावे, अशी त्याची इच्छा आहे. महेंद्रसिंग धोनी आयपीएलमधून  निवृत्त झाल्यास चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करण्यासाठी त्याने रोहितला पाठिंबा दिला आहे. “मला रोहित शर्माने २०२५ मध्ये CSK कडून खेळताना पाहायला आवडेल, जर एमएस निवृत्त झाला तर रोहित चेन्नईचे नेतृत्व करू शकेल. रोहित अजूनही ५-६ वर्ष आयपीएल खेळू शकतो. जर त्याला कर्णधारपद हवं असेल, तर कोणतीही फ्रँचायझी त्याला सहज ही जबाबदारी देईल,”असे रायुडूने न्यूज २४ स्पोर्ट्सला सांगितले.


रोहितने २३४ आयपीएल सामन्यांमध्ये १ शतक आणि ४२ अर्धशतकांच्या मदतीने ६००० हून अधिक धावा केल्या आहेत. तो सुरुवातीच्या काळात डेक्कन चार्जर्स (सनरायझर्स हैदराबाद) चा भाग होता, परंतु २०११ मध्ये मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला आणि त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही.
 

 

 

Web Title: Former Mumbai Indians and Chennai Super Kings player Ambati Rayudu wants Rohit Sharma to play for CSK in the Indian Premier League 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.