Join us  

Big News : भारताचे दिग्गज क्रिकेटपटू व्हेंटिलेटर सपोर्टवर, गेल्या महिन्यापासून घेतायेत कोरोनावर उपचार

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 25 लाख 30,490 इतकी झाली असून 18 लाख 09,702 रुग्ण बरे झाले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 4:01 PM

Open in App

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 25 लाख 30,490 इतकी झाली असून 18 लाख 09,702 रुग्ण बरे झाले आहेत. पण, 49,170 रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. भारताचे माजी दिग्गज खेळाडू चेतन चौहान यांनाही कोरोना झाला होता. भारताचे माजी कसोटीपटू आणि योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री चौहान यांना मागील महिन्यात कोरोना झाला होता. पण, शुक्रवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले आहे.   

जुलै महिन्यात त्यांना कोरोना झाला होता. चौहान यांनी 1969 ते 1978 या कालावधीत 40 कसोटी सामने खेळले. त्यांनी 31.57च्या सरासरीनं 2084 धावा केल्या असून त्यांच्या नावावर 16 अर्धशतकं आहेत. त्यांनी 13 वर्ष DDCAचे उपाध्यक्षपदही सांभाळले. त्यानंतर ते राजकारणात आले. कसोटी शिवाय त्यांनी 7 वन डे सामन्यांत 153 धावा ही केल्या. रणजी करंडक स्पर्धेत त्यांनी दिल्ली व महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं.

चेतन चौहान आणि सुनील गावस्कर यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 3000 धावांची भागीदारी केली असून त्यांच्या नावावर 10 शतकी भागीदारी आहेत. 1979 साली कसोटीत त्यांनी ओव्हलवर 213 धावांची भागीदारी करून विजय मर्चंट आणि मुश्ताक अली यांचा 203 धावांचा विक्रम मोडला होता. कसोटीत 2000 हून अधिक धावा करूनही एकही शतक नावावर असलेले ते एकमेव खेळाडू आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी 179 सामन्यांत 40.22 च्या सरासरीनं 21 शतकं आणि 59 अर्धशतकांसह 11 हजार धावा केल्या.  

1981मध्ये त्यांनी न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा वन डे सामना खेळला आणि त्यानंतर त्यांना संघातून वगळण्यात आले. 1981मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'! 

भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात'

Independence Day 2020 : व्हॉट अ‍ॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो

World Record : ट्वेंटी-20त चार चेंडूंत चार विकेट्स, मिळवला पहिला मान; मलिंगा, रशीद खान यांच्या पंक्तित स्थान

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट! 

जर्मन कंपनीनं ज्या कामासाठी मागितले 50 लाख, ते काम आपल्या इंजिनियर्सनी केलं दीड लाखात! 

Independence Day 2020 : इरफान पठाणच्या एका ट्विटनं जिंकली लाखो मनं; खेळाडूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याउत्तर प्रदेशभारतीय क्रिकेट संघ