Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'! 

England vs Pakistan 2nd Test : दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करलेली दिसली. प्रथम फलंदाजी करताना त्यांचे 9 फलंदाज 223 धावांवर माघारी परतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 03:28 PM2020-08-15T15:28:49+5:302020-08-15T15:29:24+5:30

whatsapp join usJoin us
England vs Pakistan 2nd Test : Pakistani Players Shaheen Afridi Runs Himself Out Hilariously On Day 2; Netizens Troll  | Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'! 

Video : पाकिस्तानी फलंदाज बनला मस्करीचा विषय; स्वतःलाच करून घेतलं 'रन आऊट'! 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Pakistan 2nd Test : दुसऱ्या कसोटीतही पाकिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करलेली दिसली. प्रथम फलंदाजी करताना त्यांचे 9 फलंदाज 223 धावांवर माघारी परतले आहेत. इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली, पण पाकिस्तानच्या फलंदाजांच्या उतावळेपणानंही त्यांचा घात केला. असाच एक प्रसंग कसोटीच्या दुसऱ्या दिवशी घडला. पाकिस्तानच्या फलंदाजानं स्वतःला ज्या पद्धतीनं रन आऊट करून घेतलं, ते पाहून इंग्लंडच्या खेळाडूंना हसू आवरलं नाही. 

पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटीतील शतकवीर शान मसूदला ( 1) जेम्स अँडरसननं तिसऱ्याच षटकात माघारी पाठवले. अबीद अली ( 60) आणि कर्णधार अझर अली (20) यांनी अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण अँडरसननं पुन्हा एक धक्का दिला. त्यानंतर स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुरन आणि वोक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेताना पहिल्या दिवशी पाकिस्तानचा निम्मा संघ माघारी पाठवला. पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ 45.4 षटकांनंतर थांबवण्यात आला.  

दुसऱ्या दिवशी बाबर आझम (47) आणि मोहम्मद रिझवान ( 60) यांनी संघर्ष दाखवताना पाकिस्तानचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण, अन्य फलंदाजांकडून त्यांना साथ मिळाली नाही. शाहिन शाह आफ्रिदी (0) यानं स्वतःची विकेट फेकल्यानंतर त्याला नेटिझन्सनी ट्रोल केलं. दुसऱ्या दिवसअखेर पाकिस्तानच्या 9 बाद 223 धावा झाल्या होत्या, रिझवान 60 धावांवर नाबाद आहे. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. 
पाहा व्हिडीओ..  

भाजपाने दिली होती तिकिटाची ऑफर, पण...; कंगनाने सांगितली 'राजकारण की बात'

Independence Day 2020 : व्हॉट अ‍ॅन आयडिया सर जी; भाज्यांपासून तयार केला तिरंगा; पाहा फोटो

World Record : ट्वेंटी-20त चार चेंडूंत चार विकेट्स, मिळवला पहिला मान; मलिंगा, रशीद खान यांच्या पंक्तित स्थान

IPL 2020 : मुंबई इंडियन्सनं खेळाडूंसाठी बूक केलंय आलिशान हॉटेल; RCB, CSKचा कमी नाही थाट! 

जर्मन कंपनीनं ज्या कामासाठी मागितले 50 लाख, ते काम आपल्या इंजिनियर्सनी केलं दीड लाखात! 

Independence Day 2020 : इरफान पठाणच्या एका ट्विटनं जिंकली लाखो मनं; खेळाडूंकडून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा

Web Title: England vs Pakistan 2nd Test : Pakistani Players Shaheen Afridi Runs Himself Out Hilariously On Day 2; Netizens Troll 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.