Join us

Gautam Gambhir tested positive for COVID19 : भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याला कोरोनाची लागण, म्हणाला...

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याला कोरोनाची लागण झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 10:32 IST

Open in App

Gautam Gambhir tested positive for COVID19 - भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपा खासदार गौतम गंभीर याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यानं ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यानं लिहिलं की, कोरोनाची सौम्य लक्षणे दिसत आहेत, माझा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांना मी विनंती करतो की त्यांनी कोरोना चाचणी करून घ्यावी. #StaySafe

भाजपा खासदार गौतम गंभीर ( Gautam Gambhir ) यानं कोरोना संकटात अनेक समाजकार्य केले. त्यानं त्याचा खासदार फंडातील निधी दिल्ली सरकारला कोरोनाची मुकाबला करण्यासाठी दिला. गौतम गंभीर फाऊंडेशनच्या माध्यमातून स्थलांतरीत मजूरांनाही त्यानं भरभरून मदत केली. एवढंच नव्हे तर तृतीय पंथीयांनाही लॉकडाऊनच्या काळात त्यानं रेशन पुरवले. त्याच्या पूर्व दिल्लीच्या मतदार संघात १ रुपयांत जेवणाची सोय करणारी 'जन रसोई' सुरू केली आहे.

भारतीय संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीरनं ५८ कसोटींत ४१५४ धावा केल्या आहेत, १४७ वन डे सामन्यांत त्याच्या नावावर ५२३८ धावा आहेत आणि ३७ ट्वेंटी-२०त ९३२ धावा त्यानं केल्या आहेत. आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व त्यानं केलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली KKRनं दोन जेतेपदं पटकावली आहेत. आयपीएलमध्ये त्यानं १५४ सामन्यांत ४२१७ धावा केल्या आहेत.

टॅग्स :गौतम गंभीरकोरोना वायरस बातम्या
Open in App