Join us

ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या हॉटेल रुममध्ये आढळला साप! फोटो पोस्ट करून विचारला सवाल...

ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज मिचेल जॉन्सन ( Mitchell Johnson) याच्या वाट्याला भयानक अनुभव आला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2022 17:37 IST

Open in App

लीजंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचे दुसरे पर्व सुरू आहे आणि रोमहर्षक सामने पाहायला मिळत आहेत. चार संघामधील या लीगमध्ये दोन सामने आतापर्यंत झाले आहेत आणि दोघांचाही निकाल थरारक वळणानंतर लागला. इंडियन कॅपिटल्सने गुजरात जायंट्सवर ३ विकेट्सने विजय मिळवला, तर भिलवारा किंग्सने ३ विकेट्सने मनिपाल टायगर्सचा पराभव केला.   

१० चेंडूंत ५० धावा; युसूफ- इरफान या पठाण बंधूंची कमाल; भारतीय खेळाडू जागतिक संघावर पडले भारी

दिग्गज खेळाडूंना पुन्हा मैदानावर उतरलेले पाहून चाहते जुन्या आठवणीत रमले आहे. पण, मैदानाबाहेर ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज मिचेल जॉन्सन ( Mitchell Johnson) याच्या वाट्याला भयानक अनुभव आला. इंडियन कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जॉन्सनच्या हॉटेल रूममध्ये अचानक साप आढळला. कोलकाता येथील हॉटेलमधील हा प्रसंग जॉन्सनने कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर पोस्ट केला.सापाचा फोटो पोस्ट करून जॉन्सनने विचारले की हा कोणत्या प्रजातीचा साप आहे कुणी मला सांगू शकेल का? नुकतंच तो माझ्या रुममध्ये आढलला... ब्रेट ली याने जॉन्सनच्या पोस्टवर कमेंट करताना, साप, थंम्ब्स डाऊन व हसण्याच्या इमोजि पोस्ट केल्या.  

इंडियन कॅपिटल्सच्या पहिल्याच सामन्यात जॉन्सनने गुजरात जायंट्सचा कर्णधार वीरेंद्र सेहवाग याची विकेट घेतली. तीन षटकांत त्याने २२ धावा देताना एक विकेट घेतली. सेहवागच्या संघाने हा सामना जिंकला. काही दिवसांपूर्वी जॉन्सनने भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचे कौतुक केले होते. आशिया चषक २०२२ स्पर्धेत विराटने शतकासह सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत २७६ धावांसह दुसरे स्थान पटकावले. जॉन्सन म्हणाला,'सर्वोत्तम खेळाडूने धावा करणे हे शुभसंकेत आहे आणि त्याने संघातील अन्य खेळाडूंचेही मनोबल उंचावते. तो कर्णधार असताना त्याने संघातील खेळाडूंचा दृष्टीकोनच बदलून टाकला होता. तो धावा करतो तेव्हा संघ आनंदी असतो.''

टॅग्स :आॅस्ट्रेलियासाप
Open in App