Legends League Cricket : १० चेंडूंत ५० धावा; युसूफ- इरफान या पठाण बंधूंची कमाल; भारतीय खेळाडू जागतिक संघावर पडले भारी

Legends League Cricket : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित इंडियन महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स या संघात इरफान व युसूफ या पठाण बंधूंची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 11:08 AM2022-09-17T11:08:06+5:302022-09-17T11:08:41+5:30

whatsapp join usJoin us
Yusuf Pathan 50*(35) & Irfan Pathan 20*(9) finishing games, India Maharajas beat World Giants by 6 wickets in Legends League Cricket | Legends League Cricket : १० चेंडूंत ५० धावा; युसूफ- इरफान या पठाण बंधूंची कमाल; भारतीय खेळाडू जागतिक संघावर पडले भारी

Legends League Cricket : १० चेंडूंत ५० धावा; युसूफ- इरफान या पठाण बंधूंची कमाल; भारतीय खेळाडू जागतिक संघावर पडले भारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Legends League Cricket : भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त आयोजित इंडियन महाराजा विरुद्ध वर्ल्ड जायंट्स या संघात इरफान व युसूफ या पठाण बंधूंची दमदार फटकेबाजी पाहायला मिळाली. कोलताच्या इडन गार्डन्सवर लीजंड्स लीग क्रिकेट मधील खेळाडूंमध्ये हा सामना खेळवण्यात आला. इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व हरभजन सिंगने केले, तर वर्ल्ड जायंट्सचे कर्णधारपद जॅक कॅलिसकडे होते. इंडियन महाराजाने ६ विकेट्स व ८ चेंडू राखून विजय मिळवला. तन्मय श्रीवास्तव व युसूफ यांच्या अर्धशतकी खेळीनंतर इरफानने २२२.२२ च्या स्ट्राईक रेटने  धावा चोपून विजय पक्का केला.

प्रथम फलंदाजीला आलेल्या वर्ल्ड जायंट्सला केव्हिन ओ ब्रायनने चांगली सुरुवात करून दिली. केव्हिनने ३१ चेंडूंत ९  चौकार व १ षटकारांसह ५२ धावा केल्या. हॅमिल्टन मसाकाड्जा ( १८) व कर्णधार कॅलिस ( १२) फार कमाल करू शकले नाही. दिनेश रामदिनने २९ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह नाबाद ४२ धावा केल्या. थिसारा परेरानेही २३ धावा केल्या. वर्ल्ड जायंट्सने ८ बाद १७० धावा केल्या. पंकज सिंगने २६ धावांत ५ विकेट्स घेतल्या. 

१७१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेल ( १८) व वीरेंद्र सेहवाग ( ४)  हे ओपनर लगेच माघारी परतले. मोहम्मद कैफही ११ धावांचे योगदान देऊ शकला. तन्मय व युसूफ यांनी चौथ्या विकेटसाठी १०३ धावांची भागीदारी केली. तन्मय ३९ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ५४ धावांवर माघारी परतला. त्यानंतर युसूफ व इरफान यांनी चांगली फटकेबाजी केली. युसूफने ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह नाबाद ५०, तर इरफाननं ९ चेंडूंत ३ षटकारांसह नाबाद २० धावा चोपून १८.४ षटकांत ४ बाद १७५ धावांसह विजय पक्का केला. 

१९८३च्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कर्णधार कपिल देव यांच्या खुशी फाऊंडेशन ( Khushii Foundation )ला या सामन्यातून उभा राहणारा निधी दिला जाणार आहे. ही संस्था मुलींच्या शिक्षणासाठी काम करते. या लीगमधील अम्पायर्स या सर्व महिला आहेत आणि भारतात असे प्रथमच घडणार आहे. या लीगचे पहिले पर्व वर्षाच्या सुरुवातीला मस्कत येथे पार पडले होते. या लीगमध्ये चार संघांचा समावेश आहे.  

Web Title: Yusuf Pathan 50*(35) & Irfan Pathan 20*(9) finishing games, India Maharajas beat World Giants by 6 wickets in Legends League Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.